आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या सामाजिक सुरक्षा योजनांचा पालकमंत्र्यांचा हस्ते प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक सुरक्षा योजनेखाली देशातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या तीन महत्त्वपूर्ण योजनांचा प्रारंभ शनिवारी (दि. 9 मे) करण्यात येणार आहे. पंतप्रधान सुरक्षा योजना, पंतप्रधान जीवनज्योती योजना अटल पेन्शन योजना अशा तीनही योजनांचा प्रारंभ जिल्हास्तरावर बहुद्देशीय सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.

जिल्ह्यात जिल्हा बँकेचे ग्राहक वगळता राष्ट्रीयीकृत खासगी बँकेचे मिळून २६ लाख ५९ हजार ९२९ नागरिकांचे बचत खाते आहे. मेपर्यंत जिल्ह्यात लाख २७ हजार ९२९ जणांनी सामाजिक सुरक्षा योजनेचे अर्ज भरले आहेत. योजनेचा प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक बँकेत अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे श्रीनिवास पत्की यांनी सांगितले.

आधारक्रमांक महत्त्वाचा
तीनही योजनेसाठी अर्ज भरताना बँक खाते क्रमांक आधार क्रमांक आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा आहे. तीनही योजना महत्त्वपूर्ण असून अशा योजनांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

अटल पेन्शन योजना
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी योजना आहे. १८ ते ४० वयोगटातील नागरिक यासाठी पात्र असतील. पेन्शन मिळण्यासाठी दरमहा रुपया ते हजारापर्यंत रक्कम जमा करता येईल. निवृत्तीनंतर संबंधित कामगारांनी भरलेल्या रकमेवरून हजार रुपये ते हजार रुपये पेन्शन मिळणार.

पंतप्रधान जीवनज्योती योजना
योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी ३३० रुपये भरावे लागतील. योजनेसाठी १८ ते ५० ही वयोमर्यादा आहे. यासाठी जून ते ३१ मे असा कालावधी आहे. दरवर्षी मुदतीत नूतनीकरण करावे लागणार आहे. नागरिकाचा मृत्यू झाल्यास लाख रुपये नुकसानभरपाई वारसदाराला मिळणार आहे. बँकेत ज्यांचे बचत खाते आहे, त्या सर्वांचा यामध्ये सहभाग असेल.

पंतप्रधान सुरक्षा योजना
योजनेच्या लाभासाठी प्रतिवर्ष १२ रुपये भरावे लागतील. १८ ते ७० वय असलेल्या नागरिकांना सहभागी होता येणार आहे. अपघातामध्ये जखमी झाल्यास लाख, मृत्यू झाल्यास लाख मिळतील. अपघातात एक अवयव निकामी झाल्यास लाख, दोन अवयव निकामी झाल्यास लाखांची मदत मिळणार आहे.