आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- हॉटेल्समधून थर्टी फस्र्टसाठी शिरगणतीचे फर्मान जिल्हाधिकारी कार्यालयाने धाडले आहे. शहरातील काही हॉटेलमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी करमणुकीचे कार्यक्रम सशुल्क आयोजन केले जाते. त्यात सहभागी होणार्या ग्राहकांची नोंद ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 7 ते पहाटे 2 वाजेपर्यंत नोंद करावी व तपासणी अहवाल 2 जानेवारी रोजी करमणूक कर शाखेला सादर करावा, असे आदेशच जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी काढले आहेत.
करमणूक कर वसुलीबरोबरच हॉटेलमधील अनियमितता रोखण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे समजते.
शहरातील अनेक हॉटेलचालकांनी करमणूक कर विभागाकडून मनोरंजनाच्या कार्यक्रमाविषयी परवानगी घेतली आहे. यासह अन्य प्रमुख हॉटेल्समध्ये सरकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कर्मचारी तेथे येणार्या ग्राहकांची संख्या नोंदवून घेतील. त्याचा अहवाल सादर करतील. त्याप्रमाणे हॉटेलचालकांकडून करमणूक कर वसूल करण्यात येणार आहे.
कार्यक्रमांचीही तपासणी
हॉटेल व्यवस्थापनाने कार्यक्रमापोटी करमणूक कर भरणे आवश्यक आहे. यामध्ये काही अनियिमितता आढळल्यास त्याचा स्वतंत्र तपासणी अहवाल कार्यालयास सादर करावा. तपासणीची जबाबदारी मात्र महसूलमधील करमणूक, गौण खनिज, महसूल, पुरवठा, सामान्य शाखा विभागातील अव्वल कारकून यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या निम्म्या बिलापैकी 20 टक्के रक्कम कर घेण्यात येणार आहे. एकूण ग्राहकांची संख्या नोंदवण्यात येणार आहे.
कर्मचारी येथे
जंगली, बी. के. गार्डन, अँम्बेसेडर, पॅराडाईज, न्यू विनय, राजेर्शी, शीतल, सिटी पार्क, सूर्या इंटरनॅशनल, सागर, कॉटेज गार्डन, लोकप्रिया, प्रथम, त्रिपूर सुंदरी, लोटस, वैष्णवी प्लाझा, अंबर, नागेश, धुव्र, स्पाईस अँण्ड आईस, सुखसागर, आम्रपाली, फ्रुटी बार.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.