आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police And Pollution Control Board,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मर्यादेत वाजतील डॉल्बी, साऊंड असो.चा निर्णय, पोलिसांनी डेसिबल मोजताना गोंगाटही विचारात घ्यावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विसर्जनिमरवणुकीतील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सोलापूर साऊंड सर्व्हिस अँड इलेक्ट्रिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेली ध्वनिमर्यादा ओलांडणार नाही, असा निर्णय झाल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल मुटकिरी यांनी दिली. सरकारी यंत्रणेने ६५ डेसिबलची ध्वनिमर्यादा ठरवली खरी, पण मिरवणुकीतील इतर गोंगाटाचाही त्यात समावेश होतो. त्यामुळे कारवाई करताना सर्वांगीण विचार व्हावा, असेही श्री. मुटकिरी म्हणाले.
गणरायाला निरोप देण्यासाठी शहराच्या चारही दिशांतून सोमवारी (दि. ८) मिरवणुका निघतील. त्यामुळे प्रचंड ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता आहे. त्याला रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोठी तयारी केली. ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणारे साऊंड बॉक्स जप्त करून संबंधितांवर गुन्हे नोंदवणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर साऊंड सेवा देणा-यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिस परवाना घेऊन मिरवणूक काढणा-या मंडळांसाठीच सेवा देऊ, तेही चारपेक्षा जादा बॉक्स बसवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गर्भवती महिलांनी मिरवणुकीत जाणे टाळावे. शिशुंना घेऊन जाऊच नये. त्यांच्या कानाचे पडदे नाजूक असतात. त्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या आवाजाच्या लहरी हृदयावर धडकल्याने विकार उद्भवू शकतात. डॉ.विद्याधर सूर्यवंशी, फिजिशियन
मिरवणूक म्हटल्यानंतर थोडा गोंगाट असतो का? त्याचाच आवाज कमीत कमी ५० डेसिबलचा असतो. त्यामुळे पोलिसांनी साऊंडचा डेसिबल मोजताना या गोंगाटाचाही विचार करावा. थेट कारवाई करू नये. मोतीलालमुटकिरी, अध्यक्ष,सोलापूर साऊंड सर्व्हिस
ध्वनिप्रदूषणाचे हे आहेत दुष्परिणाम
गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाला त्रास होतो.
नवजात शिशुंच्या कानाचे पडदे नाजूक असतात.
हृदय कमकुवत असणा-यांना धोका पोचू शकतो.
कानांच्या पडद्यावर कंपने आदळून बहिरेपणा येईल.
जुन्या इमारती असतील तर त्यांनाही हादरे पोचतात.
मुकी जनावरे भेदरून जातात.