आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिन्ही संघांसाठी वेगळा बंदोबस्त, सुमारे सव्वातीन हजार केंद्रांवर तयारी पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मतदानासाठी(बुधवारी) तीन हजार पोलिसांचा ताफा सज्ज ठेवलाय. बंदोबस्त प्रमुख म्हणून उत्तरची जबाबदारी उपायुक्त सुभाष बुरसे, सोलापूर दक्षिणसाठी उपायुक्त अश्विनी सानप, मध्यसाठी उपायुक्त नीलेश अष्टेकर यांच्याकडे आहे. शहारात कुठेही अनुचित प्रकार घडल्यास अवघ्या पाच-दहा मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचतील अशी व्यवस्था राहील. क्यूआरटी, कमांडो पथक सज्ज आहे. तीन मतदार संघांसाठी पोलिस बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले असून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातहजार पोलिस
जिल्ह्यातपाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी शहरात खास बंदोबस्त आहे. दहा निमलष्करी दलाच्या तुकड्या, दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या असे एकूण बारा तुकड्या नेमण्यात आलेत. अपवादात्मकरीत्या कुठे अप्रिय घटना घडल्यास पंधरा मिनिटांत पोलिस पोहोचतील असे नियोजन आहे.
निर्भयपणे मतदान करावे
कायदासुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा. नागरिकांना कुठल्याही कामासाठी मदत पाहिजे असल्यास पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क करावा.” सुभाषबुरसे, पोलिसउपायुक्त, शहर,
पोलिस प्रशासन पोलिसांचे नियोजन
जिल्ह्यातपाच हजारांहून अधिक ताफा असून आमचे नियोजन पूर्ण झाले आहे. बंदोबस्तही वाटप झालाय. मुख्य रस्त्यावर पेट्रोलिंग, तपासणी मोहीम सुरू आहे. नागरिकांनी निर्भयतेने आपला मतदानाचा हक्क बजवावा.” डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्परपोलिस अधीक्षक, ग्रामीण पोिलस

असा बंदोबस्त
उपायुक्त,साहाय्यक आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, १०३ साहाय्यक निरीक्षक, फौजदार, ११०६ पोलिस कर्मचारी, ४०० होमगार्ड, निमलष्करी दलाच्या तुकड्या (गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक येथून आल्या आहेत). याशिवाय व्रज्ज, वरुण वाहने, शीघ्रकृती दल, कमांडो पथक, राखीव पथक, दंगा नियंत्रण पथक पोलिस ठाण्यात राखीव असतील.