आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म; पोलिसावर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी पोलिस शिपाई स्टीफन स्वामी यांच्यासह पाच जणांवर गुरुवारी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्टीफन नेल्सन स्वामी (पोलिस शिपाई), नेल्सन दयाल स्वामी (वडील, पोलिस चालक), सुरेखा नेल्सन स्वामी (आई), स्टीना स्वामी आणि ख्रिस्टीना स्वामी (बहिणी) या पाच जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्टीफन याने अरविंद धाम पोलिस वसाहतमधील एका 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्ष दुष्कर्म केले. तुळजापूर रोड येथील दर्शन लॉज आणि मित्राच्या रूमवर दुष्कर्म करण्यात आले. जेव्हा त्या तरुणीने लग्नाबाबत स्टीफन यास विचारणा केली तेव्हा त्याने लग्नास नकार दिला. तसेच त्याने तू खालच्या जातीची आहेस असे अपनास्पद वक्तव्य केले. यानंतर त्या तरुणीने स्टीफनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हा त्यांनीही तिला जातीवाचक शिवीगाळ केली. यावरून स्टिफनच्या कुटुंबीयांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ती तरुणी प्रशिक्षार्थी पोलिस असल्याची चर्चा
24 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. ती तरुणी अरविंद धाम या पोलिस वसाहतीमध्ये राहात आहे. ती प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी होती, अशी चर्चा आहे. स्टीफन आणि त्याचे वडील नेल्सन हे पोलिस खात्यात आहेत.