आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवालदाराला लाच घेताना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आरोपींना पोलिस कोठडी न घेता जामिनावर मुक्त करण्याची बतावणी करून चार हजार रुपयांची लाच घेताना सलगरवस्ती पोलिस ठाण्यातील हवालदार प्रदीप झेंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केली.
राजू तुकाराम जाधव (रा. शहानगर झोपडपट्टी, लिमयेवाडी) याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. जाधव याचे त्याची बहीण आशा गायकवाड, सत्तूबाई गायकवाड यांच्यासोबत 8 मे रोजी भांडण झाले होते. परस्परांविरुद्ध फिर्याद दिल्याने 9 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण कालांतराने आपसात मिटवण्यात आले. आशा गायकवाड व चंद्रकांत गायकवाड यांना अटक करू नका, अशी विनंती राजू जाधव याने 13 ऑगस्ट रोजी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात जाऊन हवालदार झेंडे याला केली. त्यांना अटक करतो, पण पोलिस कोठडी न घेता जामिनावर तत्काळ मुक्त करतो, असे झेंडे याने सांगितले. यासाठी चार हजार रुपयांची लाच त्याने मागितली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात सापळा रचून जाधव याच्याकडून लाचेचे पैसे घेताना झेंडे याला जेरबंद करण्यात आले. उपअधीक्षक शंकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संजीव पोतनीस, दत्तात्रय गोडसे, विवेक सांजेकर,अरुण पंचवाघ, विजय पावले, दामोदर गजघाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.