आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; एकास शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अकरा वर्षीय मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी एकाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी शुक्रवारी सुनावली. अण्णप्पा रामचंद्र हडपद (वय ५२, रा. ता. अक्कलकोट) असे त्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती.

अण्णप्पा हा मुलीवर दोन वर्षापासून दुष्कर्म करीत होता. जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलीने कोणासही सांगितले नाही. नंतर तिला पोट दुखत असल्यामुळे शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर हा प्रकार समोर आला. फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पाच साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, डॉक्टर, फौजदार आर. के. धुमाळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा शाबित झाल्यामुळे दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. दहा हजार रुपये दंड झाला असून ती रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारतर्फे शीतल डोके, आरोपीतर्फे डी. ए. मुल्ला यांनी काम पाहिले.