आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या इमारती आता ‘ग्रीन झोन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पोलिस आयुक्तालय, अरविंद धाम पोलिस वसाहत, पोलिस मुख्यालयात सुमारे दोन हजार झाडी, सप्तपर्णी, सुपारी फुलांची रोप लावण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्तालयाची इमारत राज्यात पहिल्यांदाच ‘ग्रीन बिल्डिंग’ उभारण्यात आली. त्याच्या सभोवती आता झाडी लावण्याचा संकल्प पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणी ही झाडी लावणार असून भविष्यात शामानगर, वसंतनगर पोलिस वसाहतीत झाडी लावण्यात येतील. पाच हजारच्या आसपास झाडी लावण्याच संकल्प आहे. अरविंद धाम पोलिस वसाहत ही सर्वात मोठी आहे. त्याठिकाणी जलपुनर्भरण योजना अंमलात आणण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार झाला आहे.
अरविंद धाम पोलिस वसाहतीत एका पोलिस कुटुंबाला एक झाड दत्तक देणार आहे. शिवाय पोलिस मुख्यालय आयुक्तालयात झाडी लावल्यानंतर रिकरूट पोलिसांकडून त्यांची देखभाल करून घेण्यात येणार आहे.
ग्रीन बिल्डिंग झोनचा आराखडा तयार
सीपी कार्यालयाचे बांधकामही ग्रीन बिल्डिंग दर्जाचे आहे. दगड, विटा खास पध्दतीचे आहेत. चार अंडरग्राऊंड पंखे सातत्याने चालू असातात. त्यामुळे बाहेरील उष्ण तापमान थोपविण्यास मदत होते. ३० अंश सेल्सिअस तापमान इमारतीत राहते. आता झाडी लावल्यानंतर आणखी ग्रीन होईल. अन्य कामात अरविंद धाम पोलिस वसाहतीत नारळाची झाडे, फुलझाडी लावणार, लहान मुलांसाठी पार्क, जॉगींग पार्क, तीनही ठिकाणी ओपन जीम, कायमस्वरूपी योगा क्लास राहणार.
ग्रीन झोन संकल्पना पूर्णत्वास आणू
- तीन ही ठिकाणी पहिल्या टप्प्यात दोन हजार झाडी लावणार आहे. नंतर तीन हजार झाडी लावण्याचा मानस आहे. रेन वॉटर हार्वेस्टींग़ योजना, लॉन, योगा, जीम, वॉकींग ट्रॅक तयार करण्यात येईल. नियमित व्यायाम, नैसर्गिक वातावरण, ग्रीन झोन यामुळे पोलिसांचे आरोग्य, कामात सातत्यपणा वाढण्यास मदत होईल. आरोग्य, मन, बुद्धी चांग़ले राहील.”
रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...