आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Commissioner Arrested 29 Matka Bookies After Divya Marathi News

आयुक्तांच्यालेखी मटका बंदच; तर 29 जणांवर कारवाई कशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात खुलेआम मटका सुरू असताना पोलिस निरीक्षक मात्र पोलिस आयुक्तांना मटका सुरू नसल्याची माहिती देत होते. परंतु शनिवारी ‘दिव्य मराठी’च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मटकाविषयीच्या सचित्र वृत्ताने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. मटका नाहीच म्हणणार्‍या पोलिसांनी अखेर 29 मटका टपरीधारकांवर कारवाई केली. आता या प्रकरणाची पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी गंभीर दखल घेतल्याचे दिसते. खोटी माहिती देणार्‍या अधिकार्‍यावर काय कारवाई करणार, याबाबत विचारले असता दोन दिवस वाट पाहा, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

अशी झाली कारवाई

जेलरोड पोलिस ठाणे- 8, सदर बझार पोलिस ठाणे- 3, जोडभावी पेठ पोलिस ठाणे- 5, एमआयडीसी पोलिस ठाणे-6, फौजदार चावडी पोलिस ठाणे-4, विजापूर नाका पोलिस ठाणे-3 अशी एकूण 29 जणांवर कारवाई झाली. सदर बझार पोलिस ठाण्याअंतर्गत मात्र एकही कारवाई करण्यात आली नाही.

मटका बुकींवर कारवाई

मटका पूर्णपणे बंद करण्यासाठी केवळ मटका टपर्‍यांवर कारवाई करून थांबणे आवश्यक नाही. त्यासाठी टपरीधारकांसह मटका चालवणार्‍या बुकींवरही कारवाई होणे गरजेचे आहे.तेव्हाच शहरातील मटका हद्दपार होईल.

पुढील स्‍लाईड्समध्‍ये पाहा 'दिव्‍य मराठी'ने प्रसिद्ध केलेले मटका सुरु असल्‍याचे सचित्र पुरावे...