आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Commissionerate Website Should Be Updated

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस आयुक्तालयाची वेबसाइट पाहिजे अपडेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पोलिस आयुक्तालयाची वेबसाइट वर्षभरापूर्वी सुरू झाली. त्यावरील अनेक प्रोफइल अपडेट नाहीत. काही अधिकाऱ्यांची नावे तीच आहेत. महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइन तक्रार देण्यासाठी खास वेबपेज आहे. त्यावर म्हणावा तसा नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. पोलिस आमची तक्रार घेत नाहीत अशीच ओरड नागरिकांची असते. पण ऑनलाइन तक्रार नोंदवू शकत नाहीत.

पोलिस दलातील कार्यक्रमांची माहिती, रेकॉर्डवरील गुन्हेगार, घरफोडी, चोरी, मंगळसूत्र हिसकावणे या चोरांचे रेकॉर्ड आहे.
अलीकडील काळात काही आरोपी रेकॉर्डवर आलेत त्यांची माहिती मात्र नाही. याशिवाय गुन्ह्यांचा तुलनात्मक माहितीही त्यावर पाहिजे. म्हणजे वर्षभरात घरफोड्या किती झाल्या आणि उघडकीस किती आल्या. सर्वच गुन्ह्यांची माहिती अपेडट असल्यास नागरिकांनाही पोलिसांच्या कामाची माहिती कळेल.
अशी देऊ शकता ऑनलाईन तक्रार
सोलापूर सीटी पोलिस वेबसाईटवर गेल्यानंतर होमपेज येईल. त्यानंतर आॅनलाईन तक्रार देण्यासाठी खास पेज आहे. त्यावर घटनेची माहिती, नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबरची माहिती देऊन ईमेल करा. तो मेल पोलिस आयुक्तांपासून, उपायुक्त, सहायक आयुक्त, निरीक्षक यांना पाहता येईल. संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी आपल्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेऊन तक्रार नोंदवून घेऊन शकता. घर बसल्याठिकाणी आपण तक्रार देऊ शकता. पंचावन्न ते साठ अर्ज आतापर्यंत आले आहेत. त्याचा निपटाराही झाला आहे. विशेष म्हणजे ७७४६ जणांनीच वेबसाईटला भेट दिल्याची महिती आहे. बारालाख लोकसंख्या आहे. यावरून आॅनलाईम अपडेट कितीजणांचा आहे दिसून येतो.
नावे अद्याप अपडेट नाहीत
साहाय्यकपोलिस आयुक्त एन. बी. कोहिनकर हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. एमआयडीसीचे निरीक्षक अनिल बेणके, सदर बझारचे निरीक्षक मोहन शिंदे यांची तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. त्यांची नावे अद्याप अपडेट झाली नाहीत. तीच नावे प्रोफाइलवर आहेत.
माहिती मेलवरून देऊ शकता...!
परगावीजाताना घराची काय काळजी घ्यावी. एखाद्या कारणासाठी रस्ता बंद आहे, पर्यायी मार्गाचा वापर करावा. पोलिसांच्या कार्यक्रमाबाबत माहिती. जेणेकरून नागरिकांना माहिती मिळेल. त्यासाठी नागरिकांची माहिती संकलीत करून मेलवरून मेसेज देऊ शकता.