आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम बिअर शॉपी प्रकरणात पोलिस पाहताहेत तक्रारीची वाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एकीकडे तक्रार द्यायला आलेल्या नागरिकांची तक्रार स्वीकारायची नाही अन् दुसरीकडे मात्र ‘नागरिकांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा’ असे पोलिसांनी म्हणायचे, असा प्रकार शहरातल्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडला आहे.

अक्कलकोट रोडवरून यल्लालिंग मठाकडे जाण्याच्या मार्गावर उजव्या बाजूस असलेल्या ओम बिअर शॉपीने बारचे स्वरूप घेतले आहे. त्यांनी आपल्या शॉपीत पिण्याची सोयसुद्धा करून दिलेली आहे. त्यामुळे या परिसरातील वैतागलेल्या सुशिक्षित लोकांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांनी लेखी तक्रार दिली. परंतु कोणीही तक्रार घेतली नाही. त्यामुळे या लोकांनी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना भेटण्याचा निर्णय घेतला. तेथूनही त्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले, रासरोस मटका सुरू असल्याचे पुढे आले. पोलिसांची निष्क्रियता दिसत आहे.

पोलिस गप्पच कसे?
गेल्या अनेक दिवसापासून बिअर शॉपीतील हा प्रकार चालू आहे, त्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, पोलिसांना ‘राऊंड मध्ये’ ही शॉपी दिसली नाही का?, त्यांनी कारवाई का केली नाही, नागरिकांनी तक्रार करण्याची वाट पोलिस यंत्रणा पाहते का? असे अनेक प्रo्न नागरिकांतून येऊ लागले आहेत.

थेट संपर्क करू शकता
आम्ही नागरिकांची सेवा करण्यासाठीच आहोत. नागरिकांची तक्रार घेतली नाही असे कधीही होणार नाही. तरीही असे कोठे झाले असेल तर नागरिकांनी आमच्याशी मोबाइलवर किंवा आमच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करत आहे. हरिभाऊ खाडे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी, सोलापूर.