आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सात हजारांची लाच घेतल्या प्रकरणी सहायक निरीक्षक मासाळ, हवालदार राठोड निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घर जागेवरील अतिक्रमण काढून देण्यासाठी सात हजारांची लाच घेताना एमआयडीसी पोलिस ठाणेअंतर्गंत असलेल्या नई जिंदगी पोलिस चौकीचे सहायक निरीक्षक प्रकाश मासाळ (वय ३९) पोलिस हवालदार तुकाराम राठोड (वय ५४) या दोघांना शुक्रवारी रात्री अटक झाली होती. शनिवारी दोघांना पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी निलंबित केले आहे.

मासाळ राठोड या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली. जामिनासाठी अर्ज ठेवल्यानंतर तो फेटाळून लावला. दोघांना आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.

एका व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या वडिलांचे प्रजा कामगार सहकारी हौसिंग सोसायटी मजरेवाडी येथील सर्व्हे नंबर २०५-२, प्लॉट नंबर वीस या जागेवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण आम्ही काढून देतो म्हणून पोलिसांनी दहा हजारांची मागणी केली. तडजोडीने सात हजार रुपये देण्याची तडजोड झाली. त्यापूर्वी तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक संगीता हत्ती त्यांच्या पथकाने नई जिंदगी पोलिस चौकात सापळा रचला. पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

पीआयबेणके आले नियंत्रण कक्षात
एमआयडीसीपोलिस ठाण्याचे प्रमुख या नात्याने पोलिस निरीक्षक अनिल बेणके यांना नियंत्रण कक्षात नेमणूक देण्यात आले आहे. सहायक निरीक्षक आयलाने यांच्याकडे ठाण्याचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

या सिस्टिमलाही शिस्त लावू
अवैधधंदे शून्यावर राहतील असे यापूर्वीच सांगितले आहे. पोलिस ठाण्यात नागरिकांच्या कामासांसाठी कुणी पैसे मागत असतील. तर त्या सिस्टीमलाही शिस्त लावण्यात येईल. नागरिकांची कामे सरळ मार्गाने झाली पाहिजेत. यावर माझा भर आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. पीआय बेणके यांना नियंत्रण कक्षात आणले आहे. तर एपीआय मासाळ, राठोड यांना निलंबित केले आहे.
- रवींद्र सेनगावकर, पोलिसआयुक्त

पोलिसांच्याकामात, मानसिकतेत बदल
पोलिसठाण्यात सर्वसामान्य माणूस कामासाठी गेल्यानंतर त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. व्यवस्थित माहिती मिळत नाही. येन-केन प्रकारे त्रास दिला जातो. चिरीमिरीची मागणी केली जाते. यामुळे पोलिसांबंद्दल नागरिकांच्या मनात चांगली भावना नाही. दोघांमधील असलेला दुरावा दूर करण्यासाठी स्वच्छ कारभार, नागरिकांच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
फोटो - सहायक निरीक्षक प्रकाश मासाळ
बातम्या आणखी आहेत...