आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार; जयंत पाटीलांची गाडी अडवल्याने कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- टेंभू योजनेच्या निधीबाबत आटपाडी तालुक्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची गाडी अडवणा-या दुष्काळग्रस्तांवर पोलिसांनी लाठीमार केला. या वेळी आंदोलकांनीही केलेल्या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

सलग तीन वर्षे दुष्काळात होरपळत असलेल्या आटपाडी तालुक्यातील जनतेने पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. टेंभू योजनेचे पाणी तातडीने देण्याचे मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिले होते; त्यासाठी निधीही मंजूर केला. मात्र, अद्याप आटपाडी तालुक्याला टेंभू योजनेचे पाणी मिळालेले नाही. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आटपाडी येथे आढावा बैठक होती. या वेळी पाटील यांना जाब विचारण्यासाठी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला.

या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यात 13 आंदोलक जखमी झाले. पोलिसांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलकांनीही दगडफेक केली.