आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात पोलिस-नागरिक मित्र’ उपक्रम राबवणार;उपायुक्त बुरसे यांची संकल्पना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सर्वांचा लाडका गणपती बप्पांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणपती उत्सव काळात शांतता प्रस्थापित राहावी, मंडळाचे उपक्रम, घटनांची माहिती मिळावी यासाठी ‘पोलिस-नागरिक मित्र’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी ही नवी संकल्पना अमलात आणण्याचे ठरवले आहे. याबाबत ते पोलिस आयुक्तांशी चर्चा करून हा निर्णय घेणार आहेत. कामात सुसूत्रता यावी यासाठी हा उपक्रम चांगला आहे.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. कामाचा ताणही त्यांच्यावर असतो. शहरातील प्रत्येक घटनांची माहिती मिळावी यासाठी पोलिस मोहल्ला कमिटी, दक्षता कमिटी यांची मदत घेतात. पोलिस-नागरिक यांच्यात सुसंवाद राहावा यासाठी पोलिस ठाण्यात नागरिकांच्या बैठका आयोजित करतात.