आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरातील निवडणूक आणि पोलिस अधिका-यावर कारवाई?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रशांत परिचारक यांनी अर्ज दाखल करताना सोबत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना अधिकाऱ्याच्या कक्षात नेले. यात भालके यांच्यासोबत असलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर परिचारक यांना केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती निवडणूक निरीक्षक जे. चक्रवर्ती घेणार आहेत. मात्र, प्रवेश देणा-या पोलिस आधिकारी आणि अर्ज स्वीकारणा-या निवडणूक अधिका-यांविरूद्ध यासंदर्भात काय कारवाई होणार हे स्पष्ट झालेले नाही.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचना, नियम आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांकडून देण्यात आले. मात्र तरीही पोलिसांनी अर्ज भरतेवेळी उमेदवारांसोबत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना कार्यालयात सोडले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत अर्ज स्वीकारले. यावर दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली. भालके यांनी दिलेल्या खुलाशावरून निवडणूक कार्यालयाने अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर परिचारक यांनी अद्याप खुलासा पाठवलेला नाही. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर त्याप्रमाणे कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांिगतले. भालके यांनी २५ सप्टेंबरला अर्ज भरला होता. अधिकाऱ्यांच्या कक्षात त्यांच्यासोबत आठ लोक होते. तर परिचारक यांच्यासोबत नऊजण होते. चित्रीकरण तपासून कारवाई करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते.