आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौजदाराच्या निवृत्तीचा फलक लावणारा शुभचिंतक सापडेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक काळूराम धांडेकर यांच्या निवृत्तीनिमित्त कार्यक्रम पत्रिकेचे डिजिटल फलक सम्राट चौक पोलिस चौकीसमोर लावण्यात आला होता. त्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिध्द केल्यानंतर महापालिकेच्या विभागीय कार्यालयाने फलक काढला. परंतु फलक लावणा-याचा शोध प्रशासनास लागलेला नाही.

धांडेकर निवृत्त झाल्यामुळे काही सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधींच्या वतीने निरोप समारंभ ठेवला होता. महापालिकेने ‘नो डिजिटल झोन’ जाहीर केलेले असताना सम्राट चौकात त्याचा फलक लावण्यात आला होता. फलकावर अनेकांची छायचित्रे होती. त्यांना जबाबदारांची चौकशी करून ही माहिती मिळवता आली असती. मात्र, प्रशासनाने फलक लावणारा मिळत नसल्याचे सांगत हात वर केले आहे.
शोध लागत नाही
- सम्राट चौकात फलक बेकायदा लावल्याचे समजताच फलक काढला. तो लावणा-याचा शोध घेतला. पण, त्याचा शोध लागत नाही.’’
शकिल शेख, झोन अधिकारी क्रमांक 1