सोलापूर - बच्चे कंपनीला सुटी पडली की थंड हवेच्या ठिकाणी, मामाच्या गावाला, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे प्लॅन तयार असतात. पण, घर बंद करून जायचे म्हटले की नागरिकांच्या मनात चोरीची धडकी भरते. पोलिसांच्या रेकॉर्डवर पाहिल्यास वर्षभरातील सर्वाधिक चोऱ्या एप्रिल-मे या दोन महिन्यात जास्त असतात. घरफोड्या, चोऱ्या होऊ नये म्हणून सोसायट्या, कॉलनीमध्ये जाऊन सीसीटीव्ही लावून घेण्यासाठी जनजागृती करणार आहेत. गुन्हे शाखेचे एक पथकही यासाठी नियोजन करीत असल्याचे सांगण्यात आले.
विजापूर नाका, फौजदार चावडी, पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे प्रमाण जास्त आहे. काही सोसायट्या, कॉलनीमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी सोमवारपासून प्रत्येक पोलिस चौकीच्या हद्दीत जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
नागरिकांनी सीसीटीव्ही लावून घ्यावेत
सीसीटीव्ही लावून घ्या. आम्हीही रात्रगस्त वाढविली आहे. गनधारी पोलिसांना पेट्रोलिंगसाठी नेमले आहे. नागरिकांनी पूर्व काळजी घेतल्यास या घटना टळतील. शेजारी, पोलिस यांनाही गावाला जाताना माहिती द्या. म्हणजे
आपल्या घराकडे लक्ष ठेवतील. सोसायट्या, कॉलनीमध्ये जाऊन सीसीटीव्ही लावून घेण्यासाठी सूचना देणार आहोत.
नीलेश अष्टेकर, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
पोलिसांनी लक्ष द्यावे
गावठाणभाग, जुळे सोलापूर या परिसरात चोरटे लक्ष्य करतात. त्याठिकाणी पेट्रोलिंग, सर्च मोहीम घेतल्यास चोरांवर जरब बसेल. दररोज नाकाबंदी करून वाहनांची, संशयितांची चौकशी करावी. पहाटे तीन ते सहा या वेळेत बसस्थानक, रेल्वेस्थानक, मुख्य रस्त्यांवर गुन्हे शाखा, डीबी पथकाकडून गस्त, पेट्रोलिंग पाहिजे. बंद घर असतील तर रात्रगस्त देणाऱ्या पोलिसांनी याकडे लक्ष ठेवावे. कॉलनी, सोसायट्यांमध्ये नागरिक-मित्र पोलिस योजना राबवून त्यांची मदत घ्यावी.
- परगावी जातानाघरात दागिने, पैसे ठेवू नका, सुरक्षा भक्कम ठेवा.
- घरालाचांगल्यादर्जाचा कडीकोयंडा लावा, अथवा सुरक्षा रक्षक नेमा.
- शक्यअसल्याससीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा.
- दहाहजारांतआपल्या घराची सुरक्षा आपण करू शकतो (कॅमेराद्वारे).
- घरबंदअसले तरी गॅलरी, मैदानातील दिवे चालू ठेवा, खिडक्यांना पडदे लावा.
- परगावीजातानाशेजाऱ्यांना, पोलिसांना माहिती द्या.
- दागिनेबँकेतलॉकरमध्ये, पोलिस ठाण्यात जमा करा. गावावरून आल्यानंतर परत घ्या.
- सुरक्षारक्षकनेमा, घराला लॉक की, चांगल्या दर्जाचा कडीकोयंडा लावा.
- सुरक्षाबाळगणेआपल्या हाती आहे.