आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Stations Have A Copy Of The Doctor Conservation Law

डॉक्टर संरक्षण कायद्याची पोलिस ठाण्यांना मिळणार प्रत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. प्रशांत पाटील मारहाण प्रकरणी अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. उच्चस्तरीय चौकशीसह अन्य बाबींच्या स्थितीची माहिती न्यायालयास दिली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या आदेशावरून अशा घटना घडू नयेत, यासाठी मार्गदर्शक सूचनाच न्यायालयाने दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यांना वैद्यकीय कायद्याची प्रत पोहोचवली जाणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शहा यांच्या आदेशानुसार डॉ. शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोलिस निरीक्षक वायकर यांनी डॉ. पाटील यांना मारहाण केल्या घटनेवेळी हॉस्पिटलच्या भौतिक परिस्थितीची माहिती दिली आहे. याशिवाय उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीची विनंती केली आहे.

महिलेची उच्च न्यायालयात दाद :

एका गर्भवती महिलेवर उपचार न केल्याच्या मुद्यावरून सोलापूर येथील डॉ़ प्रशांत पाटील यांना पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी संबंधित महिला शेख यांनी रुग्णसेवेची हेळसांड झाल्याचा अर्ज उच्च न्यायालयासमोर सादर केला होता.

समिती करेल चौकशी

वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात मार्चअखेर अधिसूचना जारी करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने मागील शुक्रवारी राज्य शासनाला दिला आहे. ही समिती पीडित रुग्णांची तक्रार ऐकून त्यावर योग्य ती कारवाई करण्याची शिफारस करू शकेल. डॉक्टरांना मारहाण झाल्यास भादंवि कलमांऐवजी डॉक्टर संरक्षण कायद्याअंतर्गतच गुन्हा नोंदवणे अपेक्षित आहे. यासाठी पोलिस महासंचालक व अतिरिक्त गृह सचिवांवर पोलिस ठाण्यांना कायद्याची प्रत पोहोचवण्याची जबाबदारी आली आहे.