आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली गॅस एजन्सींची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-आधारकार्ड क्रमांक नसलेल्या गॅस ग्राहकांना मार्चपर्यंत घरगुती वापराचे गॅस सिलिंडर मार्चपर्यंत मिळणार आहेत, असे गॅस वितरकांनी स्पष्ट केले. तसेच आधारकार्ड क्रमांक जोडण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यास सर्व ग्राहकांना फायदा होईल, अशा विचारही पुढे आला.

आधारकार्ड क्रमांकाच्या सक्तीमुळे लोकांना गॅस मिळत नसल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने (17 जानेवारी) दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गॅस वितरक, अन्नधान्य पुरवठा अधिकारी, बँकेचे अधिकारी यांच्या समवेत आमदार प्रणिती शिंदे यांनी निवासस्थानी बैठक घेतली.

अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार, लीड बँकेचे माधव कोरवार, सागर गॅस एजन्सीचे सागर भोमाज, नवभारत गॅस एजन्सीचे पंकज शहा, मीरा गॅस एजन्सीचे दिलीप पिंदाम, देविका गॅस एजन्सीच्या सुशीला आबुटे, इण्डेन गॅसचे परमेश्वर तंबाके आदी उपस्थित होते.आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या वितरकांनी कार्यालयाबाहेर मार्चपर्यंत आधार कार्ड नसलेल्यांना अनुदानित सिलिंडर मिळणार असल्याचा फलक लावावा. पावती न देणे, अधिक पैसे घेणे, अशा कर्मचार्‍यांवर कारवाई करावी.

मुदतवाढीचा पर्याय

लीड बँकेचे माधव कोरवार व वितरकांनी अधारकार्ड जोडण्यास मुदतवाढ दिल्यास अधिकाधिक ग्राहकांना याचा लाभ मिळू शकतो असे सुचवले. इतर वर्धा, पुणे जिल्ह्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.

यासाठी नाही आधार :

गॅस सिलिंडर नोंदणी, नवीन गॅस कनेक्शन, एका एजन्सीकडून दुसर्‍या एजन्सीकडे हस्तांतर व दुसर्‍या सिलिंडरची मागणी यासाठी आधार क्रमांकाची गरज नाही. यासाठी आधार मागण्यात येणार नसल्याचे सागर गॅस एजन्सीचे सागर भोमाज यांनी सांगितले.

गॅस एजन्सीमध्ये आधार केंद्र

गॅस एजन्सीमध्ये आधार केंद्र देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीमध्ये आधार कार्ड काढण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी आधार क्रमांक बंधनकारक केल्याच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरक व अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे आदी