आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Superintendent Rajesh Pradhan News In Marathi, Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस अधीक्षक राजेश प्रधान अन् तुषार दोशीही गहिवरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अप्पर अधीक्षक तुषार दोशी ते पोलिस शिपाई या सर्वांच्या सहकार्यामुळे मी चांगले काम केले, असे पोलिस अधीक्षक राजेश प्रधान म्हणाले. त्यांच्या शेजारी बसलेल्या दोशी यांच्या पाठीवर हात ठेवून हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी चांगले नियोजन करून पोलिस दलाची घडी बसवली. नव्हे तर मला सांभाळून घेतले, असे म्हणताच दोशींना गहिवरून आले. डोळे पाणावले. यानंतर प्रधान यांनाही गहिवरून आले.
सोलापुरात पावणेचार वर्षे काम करताना चांगले अनुभव आले. लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक यांची साथ मिळाल्याचे प्रधान म्हणाले. हा भावूक प्रसंग पोलिस मुख्यालयात वार्तालाप कार्यक्रमात पाहायला मिळाला. अडीच वर्षांपासून काम करताना दोन्ही अधिकार्‍यांची मैत्री जमली होती.
गणेश कुलकर्णी खूनप्रकरण, टेंभुर्णी दरोडा तपास आदी महत्त्वाच्या कामात दोशी यांनी चांगले काम केल्याच्या उल्लेख त्यांनी केला. प्रधान यांच्या बदलीमुळे दोशींना आता एकत्र काम करता येत नसल्यामुळे हुरहूर लागल्याचे दिसत होते. मकरंद रानडे यांनी अद्याप सोलापूरचा पदभार न घेतल्यामुळे दोशी यांच्याकडे पदभार सोपविला आहे.
भावपूर्ण निरोप
श्री. प्रधान यांना उघड्या जीपमधून मुख्यालयाच्या प्रवेशद्वारपर्यंत नेण्यात आले. जीपला दोरी बांधून सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी दोरी ओढली. बँडपथकाची धून, दुतर्फा पोलिस थांबवून त्यांना मानवंदना दिली. भावपूर्ण निरोपामुळे अनेक पोलिस गहिवरले.
एसी प्रधान यांचे ठळक मुद्दे
> नियम, शिस्त, कायदा पाळला > अक्कलकोट, बाश्री संवेदनशील पण, नियोजन केल्यामुळे शांतता > तयारी अशी केली की समस्याच आल्या नाहीत > केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चांगल्या कामाचा अनुभव मिळाला > जेऊर, जिंती, बार्शी तालुका, जुनोनी, नंदेश्वर, चिंचोळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव > अक्कलकोट साऊथ पोलिस ठाणे दुधनीला नेण्यासाठी प्रस्ताव > तीनशे वाढीव पोलिस बल मिळेल