आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Traning : Happiness.... Egarness And Convocation

पोलिस प्रशिक्षण : जोष..जल्लोष आणि दीक्षांत संचालन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी सकाळी साडेसात वाजता 16 व्या प्रशिक्षण तुकडीतील 902 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत संचलन सोहळा झाला. हीरा रेहमान परसुवाले या जवानाच्या नेतृत्वाखाली 230 जवानांच्या तुकडीने शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना मानवंदना देण्यात आली.

मागील नऊ महिन्यांपासून नागपूर शहर, जीआरपी रेल्वे, वाशीम, अहिरी, गडचिरोली, नांदेड या शहरातील 902 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत होते. आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी आई, वडील, नातेवाईक केंद्रात आले होते. र्शी. रासकर यांनी सुरुवातीला जवानांच्या परेडची पाहणी केली. त्यानंतर शानदार संचलनाद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली. उपप्राचार्य जी. एन. पौळ यांनी आभार मानले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचलन केले.

सज्जनांचे रक्षण करा
पोलिस दलात काम करताना सज्जनांचे रक्षण करा. दुर्जनांना दंडुका दाखवा. ‘कायदा व सुव्यवस्था’ अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. आपणाला आज जी शपथ देण्यात आली, त्याचा अंगीकार करून देवाला स्मरून काम करा. पोलिसांची मान उंचावत ठेवा, असे आवाहन पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी केले.

‘एनएसजी’च्या धर्तीवर येथे दिले जाते प्रशिक्षण
दशहतवाद, नक्षलवादाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने सीसीटीएनएस, एनएसजीच्या धर्तीवर पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्राच्या परिसरात 13 हजार झाडे लावली आहेत. विविध खेळांचे मैदान, गोळीबार रेंज ट्रॅक उभारण्यात येणार असल्याचे प्राचार्य पी. आर. पाटील यांनी अहवाल वाचनात सांगितले.
लेझीमचा ठेका आणि आदिवासी नृत्य
सांस्कृतिक कार्यक्रमात पोलिसांनी लेझीमचा बहारदार खेळ आणि आदिवासी नृत्यही सादर केले. पीटी मासमध्ये कमळ फुलात र्शीकृष्णाचे आगमन, भारतमाता दर्शन असे नृत्य सादर झाले. फटाक्यांची आतषबाजी झाली. प्राचार्य, पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत जवानांनी जल्लोषात नृत्य केले. सहकार्‍यांसोबत फोटो काढून घेणे, नातेवाइकांना भेटणे, गावाकडे जाण्याची तयारीही पोलिसांची सुरू होते.
मेहनतीचे फळ
माझ्या मुलाने खूप मेहनत घेतली. पोलिस झाला, त्याची उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्यामुळे मी आनंदी आहे, अशा शब्दात राठोड यांचे वडील सुखदेव यांनी फोनवर आपली प्रतिक्रया नोंदविली.