सोलापूर - पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना सोलापुरात येऊन येत्या ३० जून रोजी तीन वर्षे पूर्ण होतील. मागील दीडवर्षापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरूच आहे. ती कालपासून पुन्हा सुरू झाली. नव्याने येणारा अधिकारी थेट आयपीएस, कडक शिस्तीचा, कायद्याची जरब बसवणारा, नागरिकांशी संवाद, गुन्हेगारांवर वचक ठेवणारा असावा. तरच सोलापुरातील बिघडलेली स्थिती पूर्वपदावर येईल.
वाहतूक नियम कुणीही पाळत नाहीत. राज्याबाहेरील चोरटे सोलापुरात येऊन चोरी करतात. घरफोडी, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना नित्याच्याच तर तपास अत्यल्प. पोलिस अधिकारी यांच्यात समन्वय नाही. गल्लीतील तरुण पोलिसांची गच्ची पकडतो, अरेरावी करतो. राजकीय नेतेही एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला दमदाटीची भाषा करतात. चोरट्यांवर, अवैध व्यवसायावर नियंत्रण नाही. नेमके पोलिस काम तरी काय करतात असा प्रश्न आहे. तेव्हा येणारा अधिकारी सक्षम नागरिकांच्या हितासाठी काम करणारा पाहिजे.
पोलिस-प्रशासनावरनियंत्रण पाहिजे
तत्कालीनपोलिस आयुक्त अशोक कामटे म्हणायचे गोंधळ घालणाऱ्यांना मला काठी पुरेशी आहे. डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणायचे 'एक हात मे डंडा, दुजी हात पे प्यार' म्हणजे गोंधळ घालणाऱ्यांना काठी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रेम या सूत्राने काम करून दोघांनी
आपली कारकीर्द गाजवली. हिम्मतराव देशभ्रतार यांनीही कायदा म्हणजे काय आणि तो पाळायचा कसा याचा नियमच लावून दिला होता. प्रदीप रासकर यांनीही "कायदा सुव्यवस्था' अबाधित ठेवली. पण, घरफोडी, जबरी चोरी, मंगळूसत्र अशा चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले. वाहनचालकही वाहतूक पोलिसांना दमदाटी करत आहेत.
अधिकारी-कर्मचाऱ्यांंत नाही ताळमेळ
ठाण्यातीलअधिकारी-कर्मचारी यांच्यात ताळमेळ नाही. पोलिस-जनता सुसंवाद नाहीच. नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही. प्रशासनावर पकड नसल्यामुळे पोलिस अधिकारी नेमके काय काम करतात. गुन्ह्यांची उकल का होत नाही. वाहतूक नियम नागरिक पाळत नाहीत, यावर विचार मंथनाची वेळ आली आहे.
अवैध धंद्यावर नाही अंकुश
गुन्हेशाखा, वाहतूक शाखा, सातही पोलिस ठाण्याचे पीआय, एसीपी यांच्या कामाचा आलेख काय. किती गुन्हे घडले, उघडकीस आले यावर कधी विचार झाला नाही असे दिसून येते. चाकोरीबध्द कामातच धन्यता मानली जात असल्याने अवैध धंद्यावर अंकुश नाही. यासर्व बाबींचा विचार केल्यास येणाºया पोलीस आयुक्तांबाबत तितकीच उत्सुकताही आहे.