आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो-पार्किंग कारवाईतील ‘ते’ क्रेनवाहनच बेकायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नो-पार्किंगमध्येलावलेल्या वाहनांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसोबत फिरणारे खासगी क्रेनवाहनच बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिस्तीचे धडे देण्याऱ्यांकडूनच बेशिस्तीचे दर्शन यानिमित्ताने घडत आहे.
दुचाकी वाहनांवर कारवाई करताना दोन खासगी क्रेन वापरले जाते. त्यापैकी एकाचा परवाना संपला आहे. तर दुसऱ्यासाठी फेरबदल परवानाच घेतलेला नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळाली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार परवानगीशिवाय बदल हा गंभीर गुन्हा असून यावर मोठा दंड होतो.
क्रेनवाहन (एम एच १३ आर ०१७७) रामचंद्र धनंजय सुरवसे (रा. अभिषेक नगर, पुणे रोड, सोलापूर) यांच्या मालकीचे आहे. याच्या परवान्याची मुदत २३ जुलै २०१४ला संपली आहे. तर दुसरे (एमएच १३ आर ०७२२) शिवाजी भाऊराव जाधव, (रा. पानमंगरुळ, ता. अक्कलकोट,जि. सोलापूर) यांच्या नावाने आहे. याची मुदत ३० जानेवारी २०१५ पर्यंत आहे. टाटा ४०७च्या मूळ बॉडीत बदल करून वापर केला जात आहे. या वाहनरचनेचा बदल परवाना काढलेला नाही. त्यामुळे दोन्ही वाहने उपप्रादेशिक परिवहन खाते केव्हाही जप्त करू शकते.
- मोटार वाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेता गाडीच्या बॉडीत बदल केला असेल तर त्या संबंधित वाहनांवर कडक कारवाई केली जाईल. गाडी जप्तीची देखील कारवाई होऊ शकते.” दीपकपाटील, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, सोलापूर
नो-पार्किंगमध्येलावलेल्या वाहनांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसोबत फिरणारे खासगी क्रेनवाहनच बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिस्तीचे धडे देण्याऱ्यांकडूनच बेशिस्तीचे दर्शन यानिमित्ताने घडत आहे.दुचाकी वाहनांवर कारवाई करताना दोन खासगी क्रेन वापरले जाते. त्यापैकी एकाचा परवाना संपला आहे. तर दुसऱ्यासाठी फेरबदल परवानाच घेतलेला नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळाली आहे.