आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Watch On New Year Night Dhoom style Bikers In Solapur

धूम बाइकस्वारांना पोलिस लावणार चाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - थर्टिफस्र्ट सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाईची तयारी सुरू आहे. अवघ्या सात दिवसांनंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी अनेक तरुण मुले धूम स्टाइलने दुचाकी चालवत रस्त्यावरून जातात. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून तपासणी करणार आहेत. वेगावर र्मयादा ठेवण्यासाठी सूचना देणार आहेत.

तसेच काहीजण सेलिब्रेशन म्हणून मद्य पिऊन वाहन चालवतात. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकीस्वारांची ब्रेथ अलायझर मशीनद्वारे तपासणी होणार आहे. मद्य पिऊन वाहन चालवल्यास पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील.

वाहतूक पोलिसांची तयारी
वाहतूक पोलिस शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर सुमारे तीस ते चाळीस ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणार आहेत. धूमस्टाइल बाइकस्वारांना वेगावर र्मयादा ठेवण्यासाठी नाकाबंदी करून अडथळे उभारणार आहेत. वाहतूक विस्कळीत होऊ नये, अपघात होऊ नयेत यासाठी खास काळजी घेण्यात येणार आहे.

कडक बंदोबस्त असेल
दुचाकी मद्य पिऊन चालवणे, धूम स्टाइलने बेफाम चालवणे हे रोखण्यासाठी मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावणार आहोत. मंगळवारपासूनच सर्वेसाठी आदेश दिले आहेत.’’ मोरेश्वर आत्राम, साहाय्यक आयुक्त, वाहतूक शाखा

आनंदाने स्वागत करा
शांत व संयम पाळून आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करावे. कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. घरात देवाची प्रार्थना करून परिवारात आनंद साजरा करा. दुचाकी चालवताना काळजी घ्या.’’ डॉ. सूर्यकांत कांबळे, निवृत्त सरकारी सर्जन

इथे असेल कडक नियोजन
आसरा, सात रस्ता, भय्या चौक,चार पुतळा चौक, शिवाजी चौक, जुना पुणे नाका, सम्राट चौक, जुना तुळजापूर नाका, शांती चौक, गुरुनानक चौक, कोंतम चौक, विडी घरकुल परिसर, सोरेगाव, सैफुल, जुना विजापूर नाका.