आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या कामाची वेळ कमी करावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पोलिसांचा सर्वाधिक वेळ बंदोबस्तात जातो. कामावरून घरी जायची वेळ नक्की नाही. याचा परिणाम एकूणच कामकाजावर होतो. याबाबत मान्यवर नागरिकांशी संवाद साधून कामाचा ताण, बंदोबस्त कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत मंगळवारी संवाद साधला. त्यातून ठळक मुद्दे समोर आले आहेत.

बाऊ थांबवा
बंदोबस्ताचा बाऊ केल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण आहे. पोलिसांचे मुख्य काम कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे आहे. पण, त्यांना आता वेगळेच काम करावे लागतेय. हे आता कुठेतरी वेळीच थांबले पाहिजे. डॉ. सूर्यकांत कांबळे

संख्याबळ वाढवा
शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे काम पोलिसांचे. बंदोबस्तही महत्त्वाचा आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस-नागरिक सुंसवाद हवा. बारा तास कामाची वेळ करा. त्यांना मानसिक पाठबळ हवे. अँड. राजकुमार म्हात्रे

मोर्चा र्मयादित ठेवा
मोर्चा, आंदोलनात पाचशे ते एक हजार लोकांची उपस्थिती असते. यावर नियंत्रण आणा. आपल्या मागण्यांचे निवेदन देताना आठ-दहाजण उपस्थित राहू शकतात. कमी गर्दीमुळे बंदोबस्ताचा ताण येणार नाही. व्हीआयपी दौरेही कमी व्हावेत. किरण नानजकर, नागरिक

नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक शहरातील स्थिती
नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक या शहरातही पोलिसांचा बंदोबस्तात वेळ जातो. पण, मोर्चा, आंदोलन, मिरवणुका, धार्मिक उत्सवाचा बंदोबस्त सोलापुरात जास्त आहे. डॉ. आंबेडकर जयंती उत्सव सोलापुरात आठ दिवस साजरा केला जातो. औरंगाबाद, नाशिक , पुणे शहरात एकच दिवस उत्सव असतो. पण, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम पाच-सहा दिवस होतात. गणपती व नवरात्र उत्सवाचा मोठा ताण असतो. शिवजयंती एक दिवस साजरी होते. मुंबईत आझाद मैदान परिसरात आंदोलन, मोर्चा होतात. अन्य ठिकाणी हे प्रमाण कमी आहे. एकूणच सर्वच शहरात जयंती, उत्सव, मोर्चा, आंदोलन बंदोबस्त आहेच.