आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Congress, Ncp Party Issue At Solapur

जागा वाटपानंतर समोर येणार प्रत्येक मतदार संघातील तिढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आगामीविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी प्रदेश पातळीवर चर्चा झडत असल्या तरी जिल्ह्यात त्याउलट राजकीय वातावरण तयार झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडील मतदार संघात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे तर काही ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करत आहेत. या जागा ताब्यात ठेवण्यासाठी वा विजय मिळवण्यासाठी आघाडीच्या नेत्यांसमोर ही कोंडी सोडवण्याचे आव्हान असेल.
लोकसभा निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे निष्ठावंत असलेले अनेक पदाधिकारी पक्षाला आज सोडचिठ्ठी देत आहेत. शिवाय काहीजण थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. दक्षिण सलापूर (काँग्रेस), करमाळा (राष्ट्रवादी काँग्रेस), पंढरपूर (राष्ट्रवादी काँग्रेस) या मतदार संघात आघाडीतील नेत्यांचेच आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पंढरपूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला असला तरी अपक्ष म्हणून निवडून आलेले काँग्रेसच्या गोटात वास्तव्यास असलेले विद्यमान आमदार भारत भालके यांचा पक्ष ठरल्याने परिचारक गटाची कोंडी झाली आहे. माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे पुतणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक कोणत्याही स्थितीत ही निवडणूक लढवणार असले तरी पक्ष शिवसेना असणार की भाजप यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर उत्तर मतदार संघावर दावा केला आहे. शहराध्यक्ष गादेकर, मनोहर सपाटे काही नेते तयारी करत आहेत. मागील वेळी सपाटे यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस उमेदवार कोठे पराभूत झाले होते. एकंदर आघाडीच्या उमेदवारांचा मार्ग सुकर करण्यासाठी अपक्षांचे पीक कमी करण्याचे पक्षांसमोर मोठे आव्हान असेल.