आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Nationalist Congress Party Issue At Solapur

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक चर्चेनंतर ठरवणार उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदांच्या निवडीसंदर्भात एकमत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बुधवारी बैठक झाली. मात्र, तीत निर्णय होऊ शकला नाही. निवडीपूर्वी पक्षाचे निरीक्षक सर्व सदस्यांबरोबर चर्चा करून अध्यक्ष उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवतील, असे सांगत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची पाठवणी केली. रविवारी निवड होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सत्तेत काठावर बहुमत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पदाधिकारी निवडीदरम्यान पुन्हा गटबाजी उफाळल्यास विरोधक ‘डाव’साधण्याच्या शक्यतेने धास्तावलेली जिल्‍ह्यातील नेतेमंडळी पदाधिकाऱ्यांची नावं निश्चित करणे अन् त्यावर एकमत करण्यासाठी बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

त्यास खासदार विजयसिंह मोहिते, पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, श्यामल बागल, लक्ष्मण ढोबळे, दीपक साळुंके-पाटील माजी आमदार राजन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे आदी उपस्थित होते.

आपल्याच गटाचा अध्यक्ष व्हावा, यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी सुरू आहे. पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेतेमंडळी महायुतीत दाखल झालीत. काँग्रेसने सत्तेत समान वाटा मिळाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा सत्ताधाऱ्यांना दिलाय. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पंचायत समिती सभापतीच्या निवडीदरम्यान गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसला. अडीच वर्षापूर्वी झालेल्या पदाधिकारी निवडीत बंडखोरी झाल्यामुळे विजयसिंह मोहिते गटाच्या सदस्याचा पराभव झाला होता. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान त्याची पुनर्रावृत्ती होऊ नये, धास्तवालेल्या नेतेमंडळींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर नावाबाबत एकमत करण्यासाठी बैठक आयोजिली होती. पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी व्यक्तगित चर्चा करून त्यांच्या तालुक्यातील इच्छुक सदस्यांची नावं उपमुख्यमंत्री पवार प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जाणून घेतली. पण चर्चेत एकाही नावावर नेत्यांचे एकमत झाले नाही.

नाव निश्चित झाले नाही
पदाधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा करण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीत नाव जाहीर झाले नाही. उपमुख्यमंत्री पवार प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी प्रत्येकाशी संवाद साधला. पक्षाचे निरीक्षक सोलापुरात येतील. रविवारी निवडीपूर्वी सर्व सदस्यांशी चर्चा करून उमेदवाराची नावे ते जाहीर करतील. मनोहरडोंगरे, जिल्हाध्यक्षराष्ट्रवादी काँग्रेस