आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, RPI (A) Support To BJP, Divya Marathi

भाजपच्या सोबतीला रिपाइं मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांच्या प्रचारासाठी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालय येथे शुक्रवारी झाले. शिवसेना प्रचारात उतरली नसली तरी रिपाइं मैदानात उतरल्याचे चित्र या सोहळ्यात दिसले. विशेष म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत मंचावर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.
रंगनाथ बंग यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. बनसोडे यांच्या प्रचारात रिपाइं पूर्ण ताकदीनिशी आहे. चिंता बाळगू नका, अशा शब्दात रिपाइंचे नेते राजाभाऊ सरवदे यांनी विश्वास व्यक्त केला. या वेळी रिपाइंचे के. डी. कांबळे, राम पांडगळे, रासपच्या मनीषा माने, अशोक ढाले, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, अंबादास बिंगी, अनुजा कुलकर्णी, जयर्शी धुप्पाधुळे, मोहिनी पत्की, शहाजी पवार, शंकर वाघमारे, मनपा विरोधीपक्ष नेते कृष्णहरी दुस्सा, प्रभाकर वनकुद्रे आदी उपस्थित होते.
आठवले 8 एप्रिलला सोलापुरात : महायुतीच्या प्रचारासाठी रिपाइंचे नेते रामदास आठवले 8 एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रचार सभा घेणार आहेत. पंढरपूर, मोहोळ आणि सोलापुरात आठवले यांची सभा होण्याची शक्यता आहे.