आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Shivteg Rally Traditional Band, Divya Marathi

ढोल पथकाने वेधले लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राजविजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली़ राज्यातील नामांकित बॅण्ड पथके व अश्व, हत्ती यांसह तरुणांचा जल्लोषपूर्ण सहभाग हे या मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरली़. शिवरायांच्या जयघोषाने अवघे वातावरण शिवमय झाले होत़े एकाच पेहरावातील ढोलपथकाने आपल्या तालावर युवकांना थिरकवले.

मिरवणुकीचा शुभारंभ शनिवारी दुपारी चार वाजता आरएसएम उद्योग समूहाचे प्रमुख राजेंद्र मिरगणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला़ या वेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अँड़ सुभाष जाधवर, सभापती कौशल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते संजय पाटील, संतोष निंबाळकर, रावसाहेब मनगिरे, विनोद काटे, शरद फुरडे, अनिल डिसले, बापूसाहेब बुरगुटे, मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, तानाजी बोकेफोडे, अभिजित राऊत, नगरसेवक महेदमिया लांडगे, दीपक राऊत, विजयकुमार माळी, सुधीर बारबोले, उमेश काळे, महावीर कदम आदी उपस्थित होत़े
मिरवणुकीच्या अग्रभागी अश्वावर मावळे आरूढ झाले होते. तसेच हत्तीतील अंबारीमध्ये बसलेला अभिरूप शिवाजी लक्ष वेधून घेत होता़ वासूदेवाचे पथक, लेझीम, झांझपथक, लाठी-काठी, गोफ खेळ आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आले. बॅण्ड पथके व डीजे डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती़.
‘शिवतेज’तर्फे सामाजिक उपक्रम
विविध सामाजिक उपक्रम आणि समाजप्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पालकमंत्री दिलीप सोपल, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, सभापती शमशोद्दीन केमकर आदी उपस्थित होते. बालशाहीर हेरंब पायगुडे व सहकार्‍यांचा शौर्यगाथा वीरांची हा पोवाडा, तसेच लोकनृत्याचा कार्यक्रम झाला. रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
अखिल भारतीय मराठा महासंघ
निसर्ग काळे या बालशाहिराने पोवाडा सादर केला. प्रारंभी माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, जिल्हाध्यक्ष संदीप भोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी बाळासाहेब गव्हाणे, अविनाश पोकळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खंडेश्वर मंडळ, खांडवी
प्रा. राजेंद्र दास यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवशक्तीचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, प्रा. अशोक वाघमारे, सरपंच सुरेश शेंडगे, धनाजी बरडे आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट सादरीकरण
पुण्याचे नादब्राया ढोलपथकात 40 युवक-युवती एकाच पेहरावात सामील झाले होते. अतिशय उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांनी बार्शीकरांचे लक्ष वेधून घेतले.
बार्शीतील राजविजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची शिवजयंती मिरवणूक
ढोल पथकाने वेधले लक्ष