आज होणार शिक्कामोर्तब, युतीकडून पाटलांचा अर्ज
महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ताधारी आघाडीकडून नगरसेवक बाबा मिस्त्री यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्थायी समितीतील सत्ताधार्यांचे बहुमत पाहता त्यांची निवड जवळजवळ निश्चित मानण्यात येते.
भाजप-सेना युतीकडून अविनाश पाटील यांनी अर्ज भरला आहे. दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी नगरसचिव ए. ए. पठाण यांच्याकडे अर्ज दाखल केले. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यास चिठ्ठी टाकून सभापतिपद निवडले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आहेत. महापालिकेतील सत्ताधारी आघाडीतील करारानुसार तिसर्या वर्षी स्थायी समिती सभापती काँग्रेसकडे आहे.
त्यानुसार काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांनी गुरुवारी नगरसचिव कार्यालयात येऊन दोन अर्ज दाखल केले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यापूर्वी काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत मिस्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधी पक्षाकडून अविनाश पाटील यांनीही अर्ज दाखल केले.यावेळी युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता हात वर करून मतदान होणार आहे.
आज मतदान
स्थायीतील बहूमत
काँग्रेस : 6
राष्ट्रवादी : 4
भाजप : 4
शिवसेना : 1
बसप : 1
स्थायीच्या सभापतिपदी मिस्त्री निश्चित