आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय वैमनस्यातून केला हल्ला, मनोहर डोंगरेंसह १४ जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - यात्रेतील भांडण राजकीय वैमनस्यातून बारा जणांच्या टोळीने रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवत तलवार, कु-हाड, कोयता लोखंडी पाइपने दोन महिलांसह सहाजणांवर हल्ला करून जखमी केले. बुधवारी (दि. ८) रात्री शेटफळ येथे ही घटना घडली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर सिद्धू डोंगरे यांच्यासह १४ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर जखमींच्या नातेवाइकांनी आरोपींना अटकेच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर जखमींसह रुग्णवाहिका थांबवून ठिय्या मारला. पोलिसांच्या आश्वासनानंतर त्यांना उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले.

राजन मनोहर डोंगरे, संजय मनोहर डोंगरे, नाना मनोहर डोंगरे, बंडू हणमंत डोंगरे, तानाजी बलभीम डोंगरे, औदुंबर हणुमंत डोंगरे, आप्पा महादेव कदम, दत्तात्रय महादेव कदम, बंडू वागज, धनाजी ज्ञानेश्वर भांगे, राहुल कोळी, रामलिंग भांगे, धनाजी बलभीम डोंगरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. युवराज प्रकाश गुंड, सुरेश प्रकाश गुंड, सुरेखा प्रकाश गुंड, संजय भांगे, अशोक भांगे, मालन बोंबाळे (सर्व रा. शेटफळ, ता. मोहोळ) अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी जखमी युवराज गुंड संजय भांगे यांनी फ‍िर्याद दिली. दाेन दिवसांपूर्वी सिद्धेश्वर यात्रेत लेझीम खेळण्यासाठी तू समोर उभा राहू नको, म्हणून संशयितांनी युवराज यांना दम दिला होता. तसेच यात्रेचा मंडप उतरल्यानंतर तुला बघून घेतो, अशी दमदाटी केली होती. बुधवारी यात्रेनंतर युवराज हे त्यांच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी संशयितांपैकी नऊजणांनी पिस्तुलचा धाक दाखवत तलवार, कोयत्याने युवराज यांच्यासह सुरेखा आणि प्रकाश गुंड यांना बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाले. गुंड यांची सोन्याची चेन चोरून नेल्याचे फ‍िर्यादीत म्हटले आहे.

पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
जखमींच्यानातेवाइकांनी जखमींसह रुग्णवाहिका पोलिस ठाण्यासमोर थांबवून ठिय्या मारला. आरोपींना अटक होईपर्यंत जखमींना उपचारासाठी नेण्याची भूमिका त्यांनी घेतली. पोलिस उपअधीक्षक दिलीप चौगुले पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी आरोपींना अटकेचेे आश्वास दिले. त्यांनी जखमींना उपचारासाठी सोलापूरला नेले.

मोहितेविरुद्ध डोंगरे गट
बुधवारीरात्री सव्वाआठला शेटफळमध्ये, तुम्ही रणजितसिंह मोहिते यांच्याबरोबर का फ‍िरता, भाजपचे संजय क्षीरसागर यांचे काम का करता, अशी विचारणा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यासह १२ जणांनी तलवार, कु-हाडीने फिर्यादी संजय भांगे यांच्यासह अशोक भांगे मालन बोंबाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मालन यांचे एक लाख १५ हजारांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे फ‍िर्यादीत आहे.
बातम्या आणखी आहेत...