आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा बँकेनंतर आता जिल्हा दूध संघाच्या राजकारणातही धुसफूस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळातील धुसफूस सर्वर्शुत असताना जिल्हा दूध संघाच्या राजकारणातही आता ‘मीठाचा खडा’ पडला आहे. दूध संघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत संघाचे चेअरमन प्रशांत परिचारक आणि संचालक बाळासाहेब शिंदे यांच्यात विविध विषयांवरून जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दोन दिवसांनंतरही हा वाद शमलेला नाही. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील एक चांगली सहकारी संस्था म्हणून सोलापूर जिल्हा दूध संघाची ओळख आहे. गेल्या सात वर्षांपासून दूध संघ वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. संघाचे प्रमुख आणि काही संचालक यांच्यात एक छुपा वाद आहे. माजी पदाधिकारीही ‘संघ प्रमुखांच्या’ कार्यपध्दतीवर नाराज आहेत. या संघर्षातून संघाचे माजी अध्यक्ष कुंडलिक गायकवाड यांनी संघाविरोधात याचिका दाखल केली होती. हा वाद बराच चर्चेत राहिला. आता संचालक मंडळातील धुसफूसही चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत बाळासाहेब शिंदे (मंगळवेढा) यांनी व्यवस्थापकीय संचालक शंतनू चौधरी यांना काही संस्थांकडील अँडव्हान्स, संचालकांच्या गाड्यांना दिले जाणारे डिझेल आणि एका कर्मचार्‍याचा पगार याबाबत प्रश्न विचारला. ‘संघाचे प्रशासन अँडव्हान्स आणि व्याज वसुलीबाबात दूजाभाव करीत आहे. व्याज वसुली करायची असेल तर सरसकट करावी, माहिती लपवून ठेऊ नये ’, अशी मागणी शिंदे यांनी केली. चौधरी यांच्याकडून खुलासा सुरू असताना परिचारक यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शिंदे यांनी या प्रश्नाचक प्रशासनाने उत्तर द्यावे, असा आग्रह धरला. त्यातून दोहोत खडाजंगी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोण्यावरच डोळा..
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात साखर कारखान्यांची कर्जे व शेतकर्‍यांचे कर्ज रोखे यातून वाद होतात. शेतकर्‍याच्या कर्जांतून काही संचालक कमिशन घेतात. निवडणुकात कर्जदारांचा वापर करून घेतात. सामान्य दूध उत्पादकांमुळे संघ चालतो. तर पदाधिकार्‍यांचा डोळा लोण्यावर असतो. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सभासदांना व संस्थांना अँडव्हान्स दिले जाते. कार्यकर्ता, नेता दुरावला की, त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावला जातो. यातून संघर्ष होतो.

वादाची पार्श्वभूमी
बाळासाहेब शिंदे हे दूध संघाच्या मंगळवेढा भागाचे संचालक आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामुळे प्रशांत परिचारक यांचाही मंगळवेढय़ात ‘इंटरेस्ट’ आहे. दोघेही स्वत:च्या दूध संस्थांचे हित जोपाण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातूनच हा वाद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.