आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Politics News In Marathi, Solapur Gurdian Minister Dilip Sopal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्री म्हणतात, कारखाना गोदामे तपासणीस सामोरे जाऊ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तारण असलेली साखर परस्पर विकल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप निखालस खोटा आहे. कर्जे थकीत असताना गोदामे रिकामी असे कधीच झालेले नाही. गोदामांच्या तपासणीला सामोरे जाऊ, वस्तुस्थिती समोर ठेवू, असा निर्धार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक दिलीप सोपल यांनी केला. बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या कारखान्यांसाठी कर्जे घेतली. बँकेकडे तारण असणारी साखर परस्पर विकली. त्याचे पैसेही बँकेत जमा केले नाहीत. अशांवर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. त्यावर मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळातील ‘थोरला भाऊ’ असणार्‍या पालकमंत्री दिलीप सोपल यांच्याशी काही
मुद्दय़ावर झालेली बातचीत..
आपल्या म्हणण्याप्रमाणे कारखान्यांच्या गोदामात साखर आहे. बँकेकडे तर प्रचंड थकबाकी आहे. बँकेने वसुलीकडे दुर्लक्ष कसे केले?
सोपल : वसुली काही एका दिवसाची नसते की एका सीझनची नसते. त्याला वेळ लागतो आणि ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. आता शेतकर्‍याचेच घ्या, दुष्काळ असल्याने त्यांच्याकडील कर्जवसुली थांबवण्यात आली. साखर कारखान्यांचे म्हणत असाल तर घेतलेल्या कर्जाच्या दीडपट तारण असते. त्याचे मूल्य सातत्याने वाढतच असते. त्यात घट होत नाही. अशा गोष्टी गहाण खत झाल्यानंतर कर्जे बुडवता येत नाहीत, हे अर्थशास्त्रात म्हटलेले आहे, तेच सांगतो. नुसतेच साप साप म्हणत दोरीला धोपटण्याला काय अर्थ आहे.?
> पण मोठय़ा रकमांची कर्जे संचालकांच्या कारखान्यांतच अडकल्याने सामान्य सभासद शेतकर्‍यांना पीक कर्जे मिळत नाहीत. त्याचे काय?
सोपल : त्यांचे चालूच आहे. ज्यांनी कर्जांची परतफेड केली. त्यांना कर्जे देतच आहोत. फक्त नवीन पतपुरवठा करण्यात येत नाही.
> राजू शेट्टींचे म्हणणे एवढेच आहे, की थकीत कर्जांची वसुली झाली पाहिजे. सामान्य शेतकर्‍यांना कर्जे मिळाली पाहिजेत.
सोपल : हो ना. राजू शेट्टी ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्याला दुष्काळ माहीत नाही. त्यांच्या शेतीसंदर्भातील अभ्यासाविषयी वादच नाही. पण शेती, उद्योग, व्यवसायाच्या ठिकाणी राजकारण आणू नये. तिथे आततायीपणा, राग, द्वेष चालत नाही, एवढेच त्यांना सांगायचे आहे. कारण, राजकारणातील आजचे शत्रू उद्या मित्र होतात. ही वस्तुस्थिती असून हे खासदार राजू शेट्टींनाही माहीत आहे अन् मलाही.