आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Polluted Vehicles Permit To PUC Issue At Solapur, Divya Marathi

प्रदूषण पसरवणार्‍या वाहनांनाही मिळतोय ‘पीयूसी’चा परवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढते असले तरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत चालवण्यात येणार्‍या वायू प्रदूषण चाचणी केंद्रातून वाहनांची तपासणी न करताच प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याचे (पीयूसी) प्रमाणपत्र दिले जात आहे. चाचणी न करताच प्रमाणपत्र देण्यात आले काय, याची पडताळणी करण्याची काहीच व्यवस्था नाही. परिणामी शहराच्या प्रदूषणात भर पडत असून सोलापूरकरांना अनेक विकारांना बळी पडावे लागत आहे.

वाहनासाठी वापरल्या जाणार्‍या पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनाने तसेच ऊर्जानिर्मितीसाठी वापरल्या जाणार्‍या लाकूड व कोळशामुळेही हवेतील कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढते. यामुळे दमा, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसाचे विकार, किडनीचा त्रास, डोकेदुखी, रक्तदाब, अंधत्व असे विकार बळावतात.

सोलापूरकरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागानेही शहरातील केंद्रांची तपासणी करून पारदर्शक काम करणार्‍यांनाच हा परवाना देण्याचे अधिकार देऊन फसवणूक करणार्‍यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

काय आहे नियमावली
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 115 व 116 नुसार पेट्रोल व डिझेल या इंधनांवर चालणार्‍या वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रणात असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच एका वाहनाने किमान 750 किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यावर हा परवाना काढावा लागतो. दर सहा महिन्यांनी हा काढणे बंधनकारक आहे.

काही चालकांकडे नाही प्रमाणपत्र
सोलापूर शहरातील काही सेंटरमध्ये वाहनाच्या सायलेन्सरमध्ये टाकून चाचणी करण्याच्या प्रोब पाइप आणि मशिन नसल्याचे दिसून आले. हे केंद्र चालवण्यासाठी सुरुवातीला मशिनचा खर्च अंदाजे दोन लाख रुपये आहे. त्यानंतर वार्षिक खर्च केवळ 100 रुपये इतकाच आहे. वाहनांची चाचणी केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागास कोणतेही शुल्क जमा करण्याची तरतूद नाही.

जागेवर परवाना रद्द
वाहनाची तपासणी न करता जर वायू प्रदूषण चाचणी केंद्रातून परवाना दिला जात असेल तर संबंधित केंद्राचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आम्हाला आहेत. तसेच सात दिवसांची नोटीस देऊन जागेवर परवाना रद्द ठरवू शकतो. असे शहरात होत असल्यास निदर्शनास आणावे.’’ दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

होतील हे आजार
कार्बन मोनॉक्साईड रक्तात मिसळल्याने रक्तातील हिमोग्लोबीनचे रुपांतर काबरेहिमोग्लोबीनमध्ये होते आणि त्यामुळे ऑक्सिजनच्या प्रवाहास अडथळे निर्माण होतात. याचे प्रमाण 30 टक्के इतके झाल्यास डोकेदुखी, सुस्ती येणे असे प्रकार घडतात. त्याचा परिणाम रक्ताभिसरण संस्थेवरही होतो.’’ डॉ. अशोक मंत्री
डिझेल चारचाकीस चाचणी शुल्क
5110 पेट्रोल चारचाकीस चाचणी शुल्क
590 पेट्रोलच्या दुचाकीस चाचणी शुल्क
535 शहरात एकूण प्रदूषण चाचणी केंद्रे