आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- सोलापूरच्या डाळिंबाला संपूर्ण महाराष्ट्रात चांगला दर मिळतोय. श्री. सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतही डाळिंबाची आवक वाढते आहे.
प्रतिदिन बाजार समितीत 8 ते 10 हजार कॅरेट डाळिंबाची आवक होत आहे. अंदाजे 200 टनापर्यंत हा आकडा गेला आहे. प्रति किलोस 170 च्यापुढे दर मिळत आहे.
बाजार समितीमध्ये दिवसाकाठी डाळिंबाची 60 ते 70 लाखांची उलाढाल होत आहे. मागील वर्षीपेक्षा तिपटीने आवक व उलाढाल वाढली आहे. गेल्यावर्षी हा व्यवहार डझनावर होत होता. मागीलवर्षी आवक 6 कोटी उलाढाल होती. आता 18 कोटींपर्यंत गेली असल्याची माहिती बाजार समितीचे साहाय्यक सचिव एम. व्ही. चिंचोळे यांनी दिली.
आवक होते येथून
नाशिक, नगर, पुणे, इंदापूर, बारामती, सांगली, जत, विजापूर, इंडी तालुका परिसर, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर
येथे जातो माल : आंध्र प्रदेश, हैदराबाद व जिल्ह्यात, ओरिसा, कटक, भुवनेश्वर
किलोवर केल्याचा परिणाम
2012 पर्यंत आणि त्यापूर्वी ही डाळिंबे डझनावर विकली जायची. परंतु माझ्या कारकीर्दीत मालाचा दर्जा, गुणवत्ता आणि शेतकर्यांचे हित पाहता संचालक मंडळाने त्यास किलोवर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे शेतकर्यांनाही चांगला दर मिळत आहे. आवक वाढती आहे. आमदार दिलीप माने, सभापती
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.