आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांसाठी घरकुल: पायलट प्रोजेक्ट सादर करणारी सोलापूर पालिका राज्यातील पहिली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरातील 220 झोपडपट्टीवर राजीव आवास योजनेअंतर्गत घरकुले बांधण्यासाठी सुमारे 5 हजार 500 कोटींची योजना आहे. त्यापैकी पायलट प्रोजेक्ट म्हणून महापालिकेने 9 झोपडपट्टय़ांचा समावेश असलेला 105 कोटी 49 लाख रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर केला. त्यास 20 जून रोजी राज्याने मंजुरी दिली तर म्हाडाने संमती दिली आहे. या योजनेची फाईल केंद्र सरकारडे अंतिम मंजुरीसाठी आहे. अंतिम मान्यता मिळाल्यानंतर शहरात प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे.

1872 घरकुलांचे सर्वेक्षण
2001 च्या लोकसंख्येनुसार 1872 घरकुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील 1517 घरे झोपडपट्टी जागेवर आढळले. पक्के 615 आणि 139 अतिरिक्त घरकुले असल्याने त्यांना वगळण्यात आले. 793 घरकुलांची यादी तयार झाली. त्यात भविष्यकाळात 10 टक्के वाढ धरून 827 घरकुलांचा आराखडा तयार करण्यात आला.

असा असेल सहभाग

40% व्यवसायीकरण करून रक्कम उभी करणे (पीपीपी)

10 % टक्के लाभार्थी

असे असणार आहे बांधकाम
0 टाईप 1 (तीन मजली इमारत)
0 तळघर, पार्किंग
0 पहिला मजला 269+5 टक्के
0 दुसरा मजला 269+ 10 टक्के
0 तिसरा मजला 269+15 टक्के
टाईप 2 (लिफ्टसह)
0 प्रतिघर 269 स्क्वेअर फूट चार मजली (लिफ्टची दुरुस्ती 20 वर्षे मक्तेदाराकडे)
0 269 मध्ये असा असेल घराचा आकार फुटात (बदल होऊ शकतो)
0 9 बाय 8 बेडरूम
0 12.4 बाय 10.3 हॉल
0 5.6 बाय 7.4 किचन
0 4 बाय 7.4 बाथरूम आणि टॉयलेट

प्रोजेक्टची प्रगती
9 झोपडपट्टय़ांसाठी ही योजना तयार करण्यात आली असून, पायलट प्रोजेक्ट सादर करणारी सोलापूर महापालिका राज्यातील पहिली आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर म्हाडाकडे 30 मार्च रोजी फाईल सादर करण्यात आली. त्यास 20 जून रोजी म्हाडाने मंजुरी दिली. केंद्राकडे ही फाइल आहे.

चार झोपडपट्टय़ा शासनाच्या जागेवर
या योजनेत सहभागी असलेल्या मोदी हरिजन वस्ती, शहापुरे चाळ लगत, उंब्रजकर वस्ती आणि बहुरूपी नगर या जागा शासनाच्या जागेवर आहेत. येथील जागा मनपाच्या नावाने करा, अशी मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे.

9 झोपडपट्टय़ांचा समावेश
मोदी हरिजन वस्ती, मौलाली चौक हरिजन वस्ती, मोहननगर, वैदूवस्ती, उंब्रजकर वस्ती, पाथरूट चौक, विनोबा भावे भाग 2, शहापुरे चाळलगत, बहुरूपीनगर.

अंतिम मंजुरीनंतर काम सुरू करणार
9 झोपडपट्टय़ांचे पायलट प्रोजेक्ट्स शासनाकडे सादर असून, अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करणार आहे. ही यादी तयार करताना 1995 पूर्वी झोपडपट्टी पाहून चाळणी करण्यात आली. आगामी काळात त्या परिसरात झोपडपट्टी निर्माण होणार नाही अशी योजना तयार करण्यात आली.’’ एस. डी. अवताडे, उपअभियंता, मनपा