आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेतस्थळावर हॅरी पॉटरच्या १२व्या कथेला लाखो लाइक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हवेत उडणारे मोठाले झाडू, त्यावर चष्मा घालून बसलेला हॅरी पॉटर, त्याचा पाठलाग करणारी चेटकीण, जादूई दुनिया आदींची भरगच्च मेजवानी असणारे हॅरी पॉटर या छोट्या साहसवीराचे चित्रपट आपल्याला माहीतच असतील. बाळगोपाळांसह सर्वांच्याच मनावर राज्य करणाऱ्या या पॉटरच्या नव्या १२ लघुकथा नुकत्याच १२ डिसेंबरपासून २३ डिसेंबरपर्यंत पॉटरमोअर या संकेतस्थळावर प्रकाशित होत आहेत. त्याबद्दल सर्वांनाच इतकी उत्सुकता आहे की अवघ्या दोनच दिवसांत त्याला लाखोंच्या लाइक्स आणि त-तिकेच नवे साईनअप झालेले आहेत.
ब्रिटिश लेखिका जे. के. रोलिंग यांनी ख्रिसमस सणानिमित्त त्यांच्या पॉटर मोअर या अधिकृत संकेतस्थळावर १२ ते २३ डिसेंबरदरम्यान हॅरी पॉटर हे कथानक असलेल्या नव्या १२ लघुकथा वाचावयास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यासाठी थोडक्यात माहितींची ऑनलाइन पूर्तता करून या कथा वाचता येणार आहेत. सोलापुरातूनही जवळपास दीड हजारांच्या आसपास याचे चाहते तयार झाले असून यात वाढ होत आहे. लहानांच्या या आवडीच्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी केवळ बालकच नाहीत तर त्यांचे पालकही सहभागी होत आहेत. डे टू डे अपडेट गोष्ट वाचण्याची ही उत्सुकता आहे.
जादूई दुनियेत प्रवेश
वरीलपाच टप्पे पूर्ण भरल्यावर आपण या जादूई दुनियेत प्रवेश करू शकतो. त्यावेळेस आपल्याला विझार्ड नाइट ९५३७, नेटल एल्म ३४३८, बॅटविंग २६२४३, वाईल्डविंग ११७४२, यू सिकल २१५२४ यापैकी एक टोपण नाव दिले जाते. त्यानंतर आपणास एक पासवर्ड क्रमांकही दिला जातो. तो तेथील एका चौकटीत टाकला की तुम्ही सभासद झालात हे नक्की. आणि तोच तुमचा पॉटरमोअर यूजरनेम असेल. पण, पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
ही पुस्तके, हे चित्रपट
दीफिलॉसॉफर्स स्टोन, दी चेंबर ऑफ सिक्रेट्स, दी प्रिझनर आॅफ अझकाबेन, दी गॉबलेट ऑफ फायर, दी ऑर्डर ऑफ फिनिक्स, दी हाफ ब्लड प्रिंन्स, दी डेथली हॉलोज : भाग भाग आदी.
साइनअप करा, वाचा
संकेतस्थळावरपाच साध्या टप्प्यांत वैयक्तिक माहिती भरावी लागते. त्यानंतर कथांचा समुच्चय खुला होतो. यात १२ नवनव्या कथा १२ ते २३ दरम्यान प्रकाशित होणार आहेत.