आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टाच्या हट्टामुळे युवती आली पुण्यातील हॉस्पिटलमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पासपोर्ट संबंधित व्यक्तीच्याच हाती देण्याच्या पोस्ट खात्याच्या हट्टामुळे पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या युवतीला सोलापूरला यावे लागले. पासपोर्ट घेतल्यानंतर ती पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पुन्हा दाखल झाली. मात्र, शासकीय नियमाप्रमाणे ज्याचे पासपोर्ट त्यालाच देणे अपेक्षित आहे. मात्र, ती व्यक्ती घरी नसल्यास नातेवाइकांकडेही देता येते.

नियम काय सांगतो?
मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स् अँड आयटी डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या क्रमांक 57-01/2010 बीडी, एमडीनुसार (11 एप्रिल 2012) पासपोर्ट ज्याच्या नावे आहे, त्याला देण्यात यावे. ती व्यक्ती उपस्थित नसेल तर तेथे अधिकृत व्यक्तीस देता येते.
पोस्टाने दिला त्रास
माझ्या मुलीचा पासपोर्ट आल्याचे पोस्टमनने सांगितले. ती पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल असून पासपोर्ट आम्हाला द्यावे, अशी विनंती केली. याबाबत प्रतिज्ञापत्र देण्याची तयारी दाखवली. मात्र, ते मुलीच्याच हाती पासपोर्ट देण्याबाबत आग्रही होते. डिस्चार्ज घेऊन मुलीला स्वतंत्र वाहनाने आणले.’’
सुनीता मुरारका, त्रस्त मुलीची आई
अजब कारभार
थॉयराइड उपचारासाठी दाखल असल्याची कागदपत्रे फॅक्स किंवा मेलने पाठवण्याची तयारी होती. सोलापुरातच माझ्या मावशीच्या मुलीचे पासपोर्ट ती घरात नसताना देण्यात आले. ते कसे ? नियम एक तर अंमल वेगवेगळा कसा?’’
- ऐश्वर्या मुरारका, त्रस्त विद्यार्थिनी
पासपोर्ट ज्याचा आहे, त्यालाच देणे बंधनकारक आहे. अल्पवयीन वर्गाच्या नियमानुसार लिहिता वाचता येत नसेल किंवा सही करता येत नसेल तर त्यांच्या रक्ताच्या संबंधातील व्यक्तीच्या सहीने देता येते.’’
- एस. एस. पवार, प्रभारी अधिकारी, मुख्य पोस्ट
कोणाला त्रास दिलेला नाही. आमचे काम आम्ही केले. नियमाप्रमाणे 8 दिवस आमच्याकडे ठेवून घेऊ शकतो. ’’
- श्री. प्यारे, पोस्टमास्तर, चाटी गल्ली