आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prabhawalkar And Tikekar Conform Award Issue At Solapur

प्रभावळकर, टिकेकर यांना पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहकार महर्षी शंकरराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे यंदाच्या वर्षीचे सहकार महर्षी पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले. अभिनेते दिलीप प्रभावळकर, संजय मेर्शाम, विजय केंकरे आणि अरुण टिकेकर हे मानकरी ठरल्याची माहिती संस्थेचे रामचंद्र म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहकारमहर्षींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. 11 फे ब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता फडकुले सभागृहात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या पत्रापत्री या पुस्तकाला, संजय मेर्शाम यांच्या सलाम मलाला या पुस्तकाला तर विजय केंकरे यांच्या ‘त्यांची नाटकं’ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अरुण टिकेकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घकाळ दिलेल्या योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवन गौरव पुरस्कारासाठी 15 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात येते. या पुरस्कार निवडीचे काम रजनीश जोशी व शरदकुमार एकबोटे यांनी केले. यावेळी चैतन्य म्हस्के, अरविंद जाधव उपस्थित होते.

मराठी रंगभूमीवरील उत्कृष्ट नाटकांचे दिग्दर्शक विजय कें करे यांनी इंग्रजी नाटक, नाट्यगृहे यांचा अभ्यास केला. त्या नाटकांतील सृजनात्मकतेचा अभ्यास करत त्यांनी ती लिहून काढली.

अभिनेता दिलीप प्रभावळकर हे वर्तमान घटनांवर ते अतिशय मिश्किलपणे भाष्य करतात. त्यांनी आपल्या परदेश प्रवास, होर्डिंग्जचा सुळसुळाट, मानवी स्वभावाचे कंगोरे उत्तमरीत्या टिपलेत.

धैर्यवान मुलगी म्हणून जग मलालाकडे पाहते. तिची उर्दू डायरी घेऊन तिचे भाषांतर केले आहे. त्यात तिच्या शौर्याची कथा आहे. पुस्तकासाठी मेर्शाम यांनी उर्दूवर प्रभुत्व मिळवले.