आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाच्या उद्धारासाठी येशूमसींचा जन्म; विकास रणशिंगे यांनी दिला संदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- प्रभू येशूचा जन्म जगाच्या उद्धारासाठी झालेला आहे. ही देवाची देणगी आहे. येशूने मानवाच्या कल्याणासाठी शांती, दया, प्रीती याचे अनुकरण करण्याची शिकवण दिली. त्याप्रमाणे आपण इतरांच्या आनंदासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी आपला जन्म वेचला पाहिजे, असा संदेश रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी बुधवारी येथे दिला.
सोलापुरातील विविध चर्चमध्ये सकाळी येशूच्या जन्मानिमित्त म्हणजेच नाताळानिमित्त प्रार्थना झाली. रंगभवन येथील दि फस्र्ट चर्च येथे सकाळी साडेआठ वाजता प्रार्थनेस प्रारंभ झाला. रणशिंगे यांनी पवित्र बायबलचे वाचन केले. ते म्हणाले की, परमेश्वराची उपासना बाह्यरूपात न करता ते अंतकरणपूर्वक असावे. काही नसलेल्यांना आपण काही तरी दिले पाहिजे. त्याचे दु:ख दूर सारून त्यांना आनंद मिळावा म्हणून सर्वांचे प्रयत्न असले पाहिजेत.
प्रार्थनेनंतर प्रभू येशूच्या जन्माची गाणी सादर करण्यात आली. उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रंगभवनपासून रॅली काढण्यात आली. यात हजारो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास सोलापुरातील दि फस्र्ट चर्च , मेथॉडिस्ट चर्च, ऐपिपनी चर्च, उमेदपूर चर्चवर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी विमानात अप्पाशा म्हेत्रे, जॉन फुलारे आदी उपस्थित होते.