आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीप शिंगवींना अटक व सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कारंबा येथे स्नेहालय प्रकल्पात एका महिलेला व मुलाला डांबून मारहाण केल्याप्रकरणी संशयित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप शिंगवी यांना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. नंतर त्यांची सुटका झाली. न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांची 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देऊन सुटका करण्यात आली. स्नेहालयात मारहाण केल्याप्रकरणी या आधी संस्थेच्या सचिव प्रमिलादीदी, योगेश बिराजदार, प्रकाश दंदाडे यांना अटक झाली होती. या महिलेने सोलापूर तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे. सचिव प्रमिलादीदी, योगेश बिराजदार, प्रकाश दंदाडे यांना अटक झाली होती. सदर महिलेने सोलापूर तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रदीप शिंगवी यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकारतर्फे अँड. विनायक देशपांडे काम पाहिले तर आरोपीतर्फे धनंजय माने व जयदीप माने काम पाहत आहेत. पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख व पोलिस निरीक्षक दत्तात्रय सोनवणे करीत आहेत.