आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prafulla Kadam News In Marathi, Shetkari Kamgar Party, Madha Lok Sabha Seat

शेतकरी कामगार पक्षाचे प्रफुल्ल कदमांची माढय़ात बंडखोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा सांगोल्यातील पूर्वाश्रमीचे शेकाप कार्यकर्ते, राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे सदस्य प्रा. प्रफुल्ल कदम यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली. कदम म्हणाले, की पाणीप्रश्न, चारा घोटाळा यामुळे प्रस्थापितांविरोधात संतापाचे वातावरण आहे. इतर उमेदवारांच्या तुलनेत मी चांगला उमेदवार आहे. म्हणूनच अपक्ष म्हणून लढणार आहे.


मोहितेंनाच पाठिंबा - देशमुख : शेकापने राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहितेंना पाठिंबा दिला आहे. त्या बैठकीला प्रफुल्ल कदम उपस्थित नव्हते. त्यामुळे जे बैठकीला नव्हते ते शेकापचे कार्यकर्ते कसे असू शकतील. कदम यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सांगोला येथील शेकाप नेते चंद्रकांत देशमुख यांनी दिली.