आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pralhad Lawand Arrested In The Connection Of 4 Crores Fraud

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'स्वामी समर्थ'चे 4 कोटी रूपये अपहार करणारा प्रल्हाद लावंड गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दहिटणे (ता. अक्कलकोट) येथील स्वामी सर्मथ सहकारी साखर कारखान्यात 4 कोटी 48 लाख रुपयांचा अपहार करून फरार असलेला प्रल्हाद लावंड याला ग्रामीण पोलिसांनी सोमवारी अटक केली. बारामती अँग्रो, बीड येथील शेतीपूरक उद्योगांमध्येही त्याने अपहार केल्याचे गुन्हे आहेत. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. सोमवारी अक्कलकोट रस्त्यावरून जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिस उपअधीक्षक मनीषा डुबुले यांच्या पथकाने त्याला रात्री अटक केली.


लावंड हा स्वामी सर्मथ कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक पदावर होता. मार्चअखेर झालेल्या कारखान्याच्या लेखापरीक्षणात अपहार झाल्याचे आढळून आले. लेखापरीक्षकांनी त्याच्यावर जबाबदारी निश्चित केली होती. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद झाली. तेव्हापासून लावंड फरार होता. न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी त्याने अर्जही केला होता; परंतु न्यायालयाने तो फेटाळला. राज्यातील इतर ठिकाणच्या गुन्ह्यांमुळेही पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सोलापुरातच त्याला अटक झाली.