आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणिती शिंदे यांच्या कार्यालयात मोडतोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लष्कर येथील श्रीराम बेकरी समोरील आमदार प्रणिती शिंदे यांचे संपर्क कार्यालयात शनिवारी रात्री आठच्या सुमारास काही अनोळखी तरुणांनी मोडतोड केली. शनिवारीच आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. मोडतोडीच्या प्रकारामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळेतच 15 ते 20 जणांच्या टोळक्याने कार्यालयात घुसून मोडतोड सुरू केली. या प्रकारात कुणीही जखमी झाले नाही. कार्यालयाचे, आतील काचांचे, खुच्र्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी कार्यालयाकडे धाव घेतली. सदर बझार पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.