सोलापूर - येत्या ११ जानेवारी रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या अखिल भारतीय गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली. रविवारी दुपारी संयोजन समितीची बैठक झाली, त्यात ही निवड झाली.
मधुसूदन नानीवडेकर (सिंधुदुर्ग), इलाही जमादार (पुणे), भारती भिसे (महाबळेश्वर), ए. के. शेख (पणवेल), शोभा तेलंग (इंदौर, मध्य प्रदेश) यांच्यासह गझलनवाज भीमराव पांचाळे आदी येणार आहेत.
सकाळी १० ते १२ या दरम्यान उद््घाटन सत्र दुपारी ते या वेळेत स्थानिक कलावंतांचा गझल गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी सहा नंतर पांचाळे यांचा कार्यक्रम होईल.