आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी लढत आता थेट जातीयवादी पक्षाबरोबर परिणिती शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -येत्याविधानसभा निवडणुकीत माझी लढत थेट जातीयवादी पक्षाबरोबर अाहे. सर्व समाजाला सोबत घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून केलेली मोठी विकासकामे, मतदार निष्ठावंत कार्यकर्ते ही माझी ताकद आहे. विरोधकांकडे सांगण्यासारखी कोणतीही कामे नसल्यामुळे ते माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत, अशी आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. महापालिकेच्या कारभारात स्वत: लक्ष घातल्याचे सांगत मागील चुका टाळून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील सोलापूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनसेवेची पाच वर्षे ही माहिती पुस्तिका आमदार शिंदे यांनी तयार केली आहे. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हाॅटेल त्रिपुरसुंदरीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेसच्या माध्यमातून शहरामध्ये दीड हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा त्यांनी केला. मतदार संघातील रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, आरोग्याचे प्रश्न मार्गी लावले. त्याचप्रमाणे झोपडपट्टीतील रहिवाशांना पक्की घरे देण्याबरोबरच आरोग्य पायाभूत सोयी सुविधा केल्या. रस्त्यांच्या कामांसाठी २३४ कोटींचा निधी २१२ कोटी ड्रेनेज विकासासाठी मंजूर केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शहरामध्ये दोन दिवसांंनी पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे जनतेला पाणीपट्टी करामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल. मोदीतील जगजीवनराम झोपडपट्टीतील १०० कुटुंबीयांची पक्की घरं बांधली. भविष्यात संपूर्ण शहर झोपडपट्टी मुक्त करणार असे सांगितले.
आमच्या कार्यकाळात शहरातील एकही उद्योग, व्यवसाय बंद पडला नाही. अंतर्गत मतभेदातून पूर्व भागातील बँका माझ्या कार्यकाळाच्या पूर्वीच बंद पडल्यात. त्यापैकी इंदिरा बँक नागरी बँकेच्या पुनर्वसनाचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. माझ्यावर होणारे घराणेशाहीचे आरोप चुकीचे आहेत. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो. मग, एका राजकारण्याची मुलगी राजकारणात येण्यात काय गैर? मी थेट राजकारणात आले नसून लोकशाही पद्धतीने निवडून आल्याचे सांगितले.