आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratapsinh Mohite News In Marathi, Madha Lok Sabha Seat, Solapur

प्रतापसिंह मोहिते यांची बंडखोरी, सोलापूरसाठी 49, माढय़ात 37 उमेदवारांचे अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी माढा मतदारसंघातून 19 जणांनी 22, तर सोलापूर मतदारसंघातून 34 उमेदवारांनी 42 अर्ज दाखल केले. अनुसूचित जातीसाठी राखीव सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एकूण 49 उमेदवारांचे 72 तर माढा मतदारसंघासाठी एकूण 37 उमेदवारांनी 50 अर्ज दाखल केले आहेत. सोलापूर मतदारसंघात राष्ट्रीयीकृत पक्षाचे 4 उमेदवार असून उर्वरित 45 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माढा मतदारसंघातून राष्ट्रीय पक्षाचे 8 तर 28 अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. माढय़ातून प्रतापसिंहांनी बंडखोरीचे निशाण रोवले आहे.


सोलापूर मतदासंघातील राष्ट्रीय पक्षाच्या 4 उमेदवारांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे - काँग्रेस, शरदकुमार बनसोडे - भाजप, लक्ष्मण बाबर - आप, संजीव सिद्राम सदाफुले - बसप यांचा समावेश आहे. उर्वरित 45 उमेदवार अपक्ष असून यात रिपाइं आठवले गटाच्या प्रमोद गायकवाडांसह इतर इच्छुकांचा समावेश आहे. बुधवारी माढा मतदारसंघातून अपक्ष म्हणून प्रतापसिंह मोहिते,स्वाभिमानी पक्षाचे उत्तम जानकर, महाराष्ट्र लोकशाही आघाडीकडून तुकाराम गायकवाड, स्वरूपकुमार जानकर यांनी अर्ज दाखल केले. सोलापूर मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आपचे उमेदवार लक्ष्मण बाबर यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला.


अपक्ष 28 उमेदवार : माजी खासदार प्रतापसिंह मोहिते, बळीराम सुखदेव मोरे, नागमणी किसन जक्कन, प्रफुल्ल कदम, अँड. सुभाष पाटील, गणपत परमेश्वर भोसले, डॉ. प्रमोद रामचंद्र गावडे, नीलेश औदुंबर शिंदे, विक्रम वासुदेव वाळके, नितीन मारुती जगताप, सुनीता मोहन तुपसौंदर्य, विजय महादेव सगरे, संजय कृष्णाराव पाटील-घाटणेकर, रोहित मोरे, भजनलाल यशवंत निमगावकर, सुनील जाधव, दगडू पवार, बशीर शेख, सुनीता झेंडे, सोमनाथ देवकते, डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे, शहाजहान पैगंबर शेख, गजानन दत्तात्रय पालवे, स्वरूपकुमार जानकर, संजय महाडिक, सुधीर पोळ.


अनामत रकमेतून 14 लाख 50 हजार रुपये जमा..
सोलापूर मतदारसंघातून 49 उमेदवारांनी 5 लाख 25 हजार तर माढा मतदारसंघातून 37 उमेदवारांनी 9 लाख 25 हजार रुपयांची अनामत रक्कम भरली आहे. अर्ज विक्रीतून निवडणूक कार्यालयास 35 हजार 700 रुपये मिळाले आहेत. शेवटच्या दिवशी बुधवारी दोन्ही मतदारसंघातून 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यातून 9 लाख रुपयांची अनामत रक्कम जमा झाली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री 2 वाजेपर्यंत कामकाज..
बुधवारी शेवटच्या दिवशी मोठय़ा संख्येने अर्ज आले. यामुळे अर्जांची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक कार्यालयातील कर्मचारी पहाटेपर्यंत काम करीत होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 34 अर्ज आले. शेवटच्या अध्र्या तासांत 20 पेक्षा अधिक इच्छुक आले. शिवाय गुरुवारी छाननी होणार असल्याने सर्व कामकाज रात्रीच संपविण्यात आले.


‘टायमिंग’ साधले! माढा लोकसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी त्यांनी अकलूजच्या र्शीराम मंदिरातील पुजार्‍यांकडून मुहूर्त काढून आणला होता. सोबत त्यांनाही आणले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर त्यांचे लक्ष्य ‘घड्याळा’कडेच होते. मुहूर्त साधण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. यावेळी त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या पद्मजादेवी मोहिते उपस्थित होत्या.


माढा मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाचे 8 उमेदवार (एकूण उमेदवार 37)
अधिकृत पक्षाचे उमेदवार : विजयसिंह मोहिते- राष्ट्रवादी, सदाशिव खोत - महायुती, अँड. सविता शिंदे -आप, कुंदन बनसोडे - बसप, सुरेश भीमराव घाडगे - तृणमूल काँग्रेस, नवनाथ भीमराव पाटील - हिंदुस्थान प्रजा पक्ष, उत्तम जानकर - स्वाभिमानी पक्ष, तुकाराम गोविंद गायकवाड - महाराष्ट्र लोकशाही आघाडी.