आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratapsinh Mohite News In Marathi, Vijaysinh Mohite, Nationalist Congress

विजयसिंहांपेक्षा प्रतापसिंह श्रीमंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते हे विजयसिंहांपेक्षा लहान असले तरी त्यांची संपत्ती 8 कोटी रुपयांनी अधिक आहे. प्रतापसिंह मोहिते यांनी बँक खात्यापेक्षा अधिक रक्कम शेअर्समध्ये गुंतवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावे मुंबई, पुणे याठिकाणी 10 कोटी रुपयांचे बंगले आहेत. प्रतापसिंह यांच्याकडे 3 कोटी 66 लाख, पत्नी पद्मजादेवी यांच्याकडे 1 कोटी 56 लाख 84 हजार, मुलगी धनश्री यांच्याकडे 78 लाख 60 हजार रुपये किमतीची जमीन आहे.
कुटुंबाची एकूण मालमत्त्ता 25.77 कोटी आहे. प्रतापसिंह यांची बँक खात्यावर 32 लाख 92 हजार तर शेअर्समध्ये 1 कोटी 97 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. पत्नीच्या नावे बँक खात्यावर 23 लाख 10 हजार 352 तर शेअर्समध्ये 63 लाख 71 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. मुलगी धनश्री हिच्या नावे बँकेत 3 लाख 52 हजार 892 तर शेअर्समध्ये 6 लाख 75 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. स्वत:कडे 23 लाख 44 हजार किमतीचे 728 ग्रॅम सोने व 2 किलो चांदी आहे. पत्नी पद्मजादेवी यांच्याकडे 74 लाख 83 हजार 437 रुपये किमतीचे 2 हजार 425 ग्रॅम सोने तर मुलगी धनश्रीकडे 16 लाख 27 हजार रुपयांचे 532 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. स्वत:कडे 1 लाख 50 हजार 930, पत्नीकडे साडे सहा लाख तर धनश्रीकडे साडे दहा हजार रोख आहेत.


एक कोटीचे कर्जही : प्रतापसिंह यांच्या नावावर 1 कोटी 5 लाख 82 हजार 636 तर पत्नी पद्मजादेवी यांच्या नावावर 50 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी 2012-13 या वर्षामध्ये स्वत: 38 लाख 65 हजार 939 तर पत्नीच्या नावे 4 लाख 69 हजार 926 रुपयांचा आयकर भरला आहे.