आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratapsinh Mohite Patil Files Nomination From Madha News In Marathi

माढय़ात भाऊबंदकी : प्रतापसिंह मोहितेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात त्यांचे बंधू, माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शेकडो सर्मथक, पत्नी पद्मजादेवी, पुत्र धवलसिंह, सून उर्वशीराजे यांच्यासह आठ महिन्यांची नात इलाक्षी या वेळी उपस्थित होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रतापसिंहांनी सहकुटुंब पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मोहितेंनी कोणत्याही प्रकारची रॅली, पदयात्रा न काढता थेट सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारीच केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनीही यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. मागील वेळी शरद पवार या मतदारसंघातून निवडून आले होते. या वेळी विजयसिंह मोहिते पाटलांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यातच आता मोहिते पाटलांना घरातूनच विरोध होत असल्यामुळे त्यांच्यासमोर विरोधकांप्रमाणेच स्वकीयांचेही आव्हान आहे.