आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतापसिंह यांच्यावर 'लीलावती'मध्ये उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते यांची प्रकृती स्थिर असली तर त्यांना अत्याधुनिक उपचारासाठी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ते गेल्या २० दिवसांपासून जहाँगीर रुग्णालयात उपचार घेत होते.

प्रतापसिंह मोहिते यांना इंटर्नल इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती खालावली हाेती. त्यामुळे त्यांना पुण्याच्या जहाँगीर रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर अाहे, अशी माहिती डॉ. धवलसिंह मोहिते यांनी दिली.

प्रतापसिंह मोहिते यांची सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह अनेक मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार यांनी पुणे येथील जहाँगीर रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. जहाँगीर रुग्णालयात त्यांच्यावर डॉ. अंबिके, डॉ. अरोया, विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार (अकलूज) आणि त्यांचे पथक उपचार करत होते.

लीलावती रुग्णालयात प्रतापसिंह यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या नेतृत्वाखालील डाॅक्टरांचे पथक उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे बंधू जयसिंह मोहिते यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...